जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घातक आहेत ‘हे’ Foods Combinations; चुकूनही एकत्र खाऊ नका

घातक आहेत ‘हे’ Foods Combinations; चुकूनही एकत्र खाऊ नका

पावसाळ्यात पचण्यास जड असलेले पदार्थ खाल्ले तर, पचनाच्या समस्या निर्माण होतात.

पावसाळ्यात पचण्यास जड असलेले पदार्थ खाल्ले तर, पचनाच्या समस्या निर्माण होतात.

चुकीचे अन्न पदार्थ एकत्र खाल्लायने (Foods Combinations) शरीरामध्ये विषाक्त पदार्थांची निर्मिती होते. त्यामुळे न खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली,10 जुलै: आपण जेवताना अनेक पदार्थ (Foods) एकत्र खातो काही डिश बनवताना अनेक पदार्थ एकत्र केले जातात मात्र, हे पदार्थ एकत्र केल्यामुळे किंवा एकत्र खाल्ल्यामुळे शरीराला पचवणं कठीण (Difficult to digest) होऊन जातं. असे पदार्थ पचायला 24 ते 72 तास ही लागू शकतात. डॉक्टरांच्या मते असे चुकीचे पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे पोट खराब होतं. पचनव्यवस्थेवर परिणाम (Effect on Digestion system) होतो. कधीकधी आपलं पोट बिघडल्याने लूज मोशन, बद्धकोष्टता असे अनेक त्रास व्हायला लागतात आणि नेमकं कशामुळे हे होतंय हे आपल्या लक्षातच येत नाही. या चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे (Wrong Food Combination) अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसचाही त्रास होतो. शिवाय असे विषाक्त पदार्थ पोटात गेल्यामुळे अनेक आजारांचं कारण बनू शकतात. त्यामुळे चुकीचे फूड कॉम्बिनेशन्स घेऊ नयेत. लवकर पचणारे आणि हळूहळू पचणारे अन्नपदार्थ या दोन पद्धतीमध्ये त्यांचं विभाजन करता येतं. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाल्ल्याने अनेक समस्या निर्माण होतात. डॉक्टरांच्या मते वेगवेगळे खाद्यपदार्थ पचवण्यासाठी वेगवेगळ्या PH लेव्हलची गरज असते आणि हे वेगवेगळी PH लेव्हल आवश्यक असणारे पदार्थ एकत्र खाल्ल्याने अडचणी येतात. काही नुकसानदायक फूड कॉम्बिनेशन्स तांदूळ आणि संत्र आणि ओट्स केळं, मनुका आणि दूध एनर्जी ड्रिंक आणि मद्य, ड्रायफ्रूट, अंड,दूध आणि दही यांच्याबरोबर आणखीनही धोकादायक फूड कॉम्बिनेशन्स आहेत. ( अरे देवा! कोरोनापासून सुटका नाहीच; मोदी सरकारने महासाथीबाबत दिली मोठी माहिती ) दूध आणि केळं एक्सरसाइज करणारे लोक दूध आणि केळी एकत्र घेतात. मात्र दूध आणि केळ हे कॉम्बिनेशन अतिशय भयंकर आहे. दुधामुळे शरीरात विषाक्त पदार्थ वाढतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांसाठी हे कॉम्बिनेशन नुकसानदायक आहे. यामुळे स्टोरींग हार्मोन आणि इन्सुलिन वाढंतं. ( आठवड्याभरात वजन कमी करायचंय? फॉलो करा या 6 सोप्या टिप्स ) दूध आणि चहा लोकांना दुध घातलेला चहा प्यायला आवडतो मात्र, अशा प्रकारचा चहा पिण्यामुळे पोटावर वाईट परिणाम होतो. चहामध्ये anti-inflammatory गुण असतात दूध आणि चहा एकत्र घेण्यामुळे हे गुण संपून जातात. चहा प्यायचा असेल तर तो ब्लॅक टी किंवा ब्लॅक टीमध्ये लिंबू पिळून घेतल्याने फायदा होतो. फळं आणि दही काही जणांना दही रायता खायला आवडतो. दह्यामध्ये काही फळ घालून देखील रायता बनवला जातो. मात्र दही आणि फळं एकत्र खाणं धोकादायक आहे. फळं आणि दही एकत्र झाल्यानंतर विषाक्त पदार्थांची निर्मिती होते. त्यामुळे ऍलर्जी देखील होऊ शकतं. ( शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी आहे उपयुक्त हे जादुई फूल ) फळं आणि भाज्या फळं आणि भाज्या एकत्र खाल्ल्यामुळे देखील पोट खराब होतं. फळांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे जेवण पचायला अडचण निर्माण होते. फळ, भाज्या वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आहेत. त्यामुळे पचायला लागणारा कालावधी वेगवेगळा असतो. त्यामुळे एकत्र खाऊ नयेत असं डॉक्टरही सांगतात. प्रोटीनचे वेगवेगळे स्त्रोत प्रोटीन पचायला अतिशय जड असतं. त्यामुळे दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीनयुक्त पदार्थ एकत्र खाऊ नये. कारण त्यांना पचण्यासाठी लागणारा वेळ जास्त असतो आणि त्यामुळे डायजेशन सिस्टीमवरती परिणाम होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात