जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हे गुण तुम्हाला बनवतील चांगला जोडीदार; सुखी संसाराच्या सोप्या टिप्स

हे गुण तुम्हाला बनवतील चांगला जोडीदार; सुखी संसाराच्या सोप्या टिप्स

चांगले जोडीदार कसे असावेत

चांगले जोडीदार कसे असावेत

जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आणि इतर कोणत्याही अडचणी असताना, आपलं प्रेम कमी होऊ देऊ नका. तुम्हाला एक चांगला जोडीदार म्हणून रहायचं असेल तर स्वत:मध्ये काही बदल करायला हवेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : प्रत्येकालाच वाटतं की, आपल्या पार्टनरमध्ये काही खास गुण असावेत. ज्यामुळे त्यांचं नातं मजबूत राहील. प्रत्येकजण त्यांच्या जोडीदारामध्ये एका प्रेमीचे गुण शोधत असतात. आपल्या प्रिय व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी आवश्यक असलेले काही गुण आपल्यात असतील किंवा नसतील तर, काही बदल करून आपण आपल्यामध्ये बर्‍याच चांगल्या गोष्टी निर्माण करू शकतो. जर, तुम्ही एक चांगला प्रियकर/पती किंवा मैत्रीण/ पत्नी बनलात तर, भविष्यात तुमचं नातं आणखी मजबूत होईल**.** फक्त आपल्या आतील प्रेयसी आणि मैत्रिणीला जिवंत ठेवणं आवश्यक आहे. म्हणजेच, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आणि इतर कोणत्याही अडचणी असताना, आपलं प्रेम कमी होऊ देऊ नका आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर एकमेकांवर निस्सीम प्रेम करा. तुम्हाला एक चांगला जोडीदार म्हणून रहायचं असेल तर, स्वत:मध्ये काही बदल करायला हवेत. चैतन्य सळसळू द्या आपल्या संभाषणात चैतन्य सळसळू द्या. आपला आनंदी स्वभावच आपल्या जोडीदाराला आपल्या जवळ आणेल. त्यामुळे जोडीदार आपल्या मनातलं तुम्हाला उघडपणे सांगू शकेल. म्हणून आनंदी राहण्याची सवय लावा. तुमची भेट, सहवास इतरांच्या जीवनात आनंदाचं कारण बनू द्या. यामुळे आपल्या नात्यात कधीही कटुता येणार नाही. सुरक्षेची जाणीव तुम्ही तुमच्या जोडीदारावर कितीही प्रेम करा पण, त्याचा सन्मान राखणंही आवश्यक आहे. त्यामुळे तुमचं वागणं असं असावं की जोडीदाराला वाटलं पाहिजे की त्याला सन्मान मिळतो आहे आणि तो सुरक्षित आहे.

News18लोकमत
News18लोकमत

विचारांची देवाण-घेवाण नात्याला कितीही काळ लोटला तरी, त्याला तरुण ठेवण्यासाठी विचारांची देवाण-घेवाण व्हायला हवी. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधत रहा. यामुळे एकमेकांच्या आवडीनिवडी समजल्यानं तुमचं नात आणखीन घट्ट होईल. हे वाचा -  ‘हे’ आजार असलेल्या लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं ठरेल धोक्याचं कोणतीही जबरदस्ती नको कोणतीही गोष्ट हट्टाने कबूल करून घेऊ नका. त्यामुळे तुम्ही जवळ असूनही दुरावा वाढेल. कारण, जेव्हा तुम्ही जोडीदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करता तेव्हा, तो तुमच्यापासून दूर जायला लगतो. त्यामुळे आपली कोणतीही गोष्ट कबूल करून घेण्यासाठी प्रेम आणि सामंजस्याने समजवा. हे वाचा -  फक्त एक कप दुधाने दूर होतील टाचांवरील भेगा, रात्रीच्यावेळी असा करा वापर मैत्रीपूर्ण व्यवहार चांगला पार्टनर नेहमी आपल्या जोडीदाराच्या मित्रपरिवाराबरोबर चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर तुमचं तुमच्या जोडीदारावर प्रेम आहे तर, त्याचे नातलग, परिवार, मित्रमैत्रिणी यांचाही सन्मान करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात