मराठी बातम्या /बातम्या /heatlh /पाच संत्री आणि एक सामोसा यांच्यातून मिळतात सारख्याच कॅलरीज तरी आहारदृष्ट्या सामोसाच वाईट का?

पाच संत्री आणि एक सामोसा यांच्यातून मिळतात सारख्याच कॅलरीज तरी आहारदृष्ट्या सामोसाच वाईट का?

सामोश्यासारखे पदार्थ खाण्यास मनाई केली जाते आणि फळं खाण्याचा आग्रह केला जातो. हे असं का असा प्रश्न अनेकांना पडत असतो.

सामोश्यासारखे पदार्थ खाण्यास मनाई केली जाते आणि फळं खाण्याचा आग्रह केला जातो. हे असं का असा प्रश्न अनेकांना पडत असतो.

सामोश्यासारखे पदार्थ खाण्यास मनाई केली जाते आणि फळं खाण्याचा आग्रह केला जातो. हे असं का असा प्रश्न अनेकांना पडत असतो.

    वजन कमी (Weight Loss) करायचं असेल तर व्यायामाबरोबर (Exercise) अनिवार्य ठरतं ते डाएट (Diet) म्हणजेच संतुलित आहार. या डाएटमध्ये मोजल्यजातात कॅलरीज (Calories). आपलं वजन, उंची, दिवसभराचे वेळापत्रक बघून आहारतज्ज्ञ आपल्याला आपला आहार ठरवून देतात. यामध्ये कोणत्या पदार्थातून किती कॅलरीज मिळतात तसंच आपल्या शरीराला दिवसभरात किती कॅलरीज आवश्यक असतात. त्यानुसार कोणते पदार्थ खायचे, कोणते नाहीत, याची एक यादीच तयार करून दिली जाते. तळलेले चमचमीत पदार्थ, बटाटा, भात आदी पदार्थ खाण्यावर बंधनं घातली जातात. फळे (Fruits), हिरव्या भाज्या (Green Vegetables) खाण्यावर भर दिला जातो. मात्र एखादा सामोश्यासारखं पदार्थ एखादे फळ यांच्यातील कॅलरीज प्रमाण समान असले तरी सामोश्यासारखे पदार्थ खाण्यास मनाई केली जाते आणि फळं खाण्याचा आग्रह केला जातो. हे असं का असा प्रश्न अनेकांना पडत असतो. याचं उत्तर देण्याचा हा प्रयत्न. टीव्ही9 हिंदी डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    प्रथम आपण कॅलरीजचे गणित समजून घेऊ या. उदाहरणार्थ एक संत्र (Orange) खाल्ल्यास, त्यातून आपल्याला 47 कॅलरी मिळतात तर शंभर ग्रॅम द्राक्षे (Grapes) खाल्ली, तर त्यातून 67 कॅलरीज मिळतात. एक ग्लास दूध (Milk) प्यायल्यास 42 कॅलरी मिळतात. त्याचबरोबर व्यायाम केल्यामुळे किती कॅलरी खर्च केली जाते याचीही माहिती दिली जाते. कॅलरीज मीटरच्या सहायाने आपणही कॅलरीजचे मोजमाप करू शकतो. जेवढ्या कॅलरीज अन्नाद्वारे मिळवल्या तेवढ्या व्यायामाद्वारे खर्च नाही झाल्या तर त्या चरबीच्या (Fats) रुपात शरीरात साठवल्या जातात. हे गणित पक्कं झाल्यावर आपणही प्रत्येक गोष्ट खाताना त्यातून किती कॅलरीज मिळतात हे बघू लागतो.

    उदाहरणार्थ, एक संत्र खाल्ल्यास 47 कॅलरीज मिळतात तर एक समोसा खाल्ल्यानंतर 250 कॅलरीज मिळतात याचाच अर्थ एका सामोशातून मिळणाऱ्या कॅलरीज पाच संत्र्यामधून मिळू शकतात. मात्र तरीही आहारतज्ज्ञ संत्री कितीही खा; पण समोसा 15 दिवसांत एकदाच तेही एकापेक्षा जास्त नाही, असं का सांगतात असा प्रश्न पडतो.

    हे वाचा - डान्स करा, ताण विसरा; पाहा zumba dance करण्याचे मोठे फायदे

    सर्वांत प्रथम कॅलरी समजण्याचे आणि मोजण्याचा शोध लावणारे फ्रान्समधील फूड सायन्स क्षेत्रातील प्रसिद्ध संशोधक निकोलस क्लेमेंट (Nikolas Clement) यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. कॅलरी म्हणजे एखाद्या विशिष्ट खाद्यपदार्थातील ऊर्जा;मात्र सर्व प्रकारच्या ऊर्जा एकसारख्या नसतात, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या कॅलरीदेखील एकसारख्या नसतात. अर्धा किलो तळलेले बटाटे (Potato) किंवा अर्धा किलो द्राक्षातील कॅलरी समान असली तरी त्यातील ऊर्जा समान प्रकारच्या नसतात. द्राक्षातील कॅलरीजचे सहजपणे ऊर्जेत रुपांतर होते; पण तळलेल्या बटाट्यातील कॅलरीजचे ऊर्जेत रुपांतर होण्यासाठी वेळ लागतो. म्हणूनच समोसा किंवा तळलेले बटाटे खायचे असल्यास, त्यातील कॅलरीजचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी किमान 10 किलोमीटर चालणे आवश्यक आहे. तरच त्या कॅलरींचे रूपांतर ऊर्जेमध्ये होईल आणि ती खर्च होईल. अन्यथा, त्याचे चरबीत रुपांतर होईल’, असं क्लेमेंट यांनी स्पष्ट केलं.

    त्याचप्रमाणे कार्ब्स (Carbs), प्रोटीन्स (Proteins), व्हिटॅमीन्स (Vitamins) यांच्यापासून मिळणाऱ्या कॅलरीज म्हणजे ऊर्जा सारखी नसते. त्यामुळं संत्र आणि समोसा समान कॅलरीज देणारे असले तरी संत्र्याऐवजी सामोसा खाऊन चालत नाही. रोज पाच संत्री खाल्ली तरी वजन वाढणार नाही; मात्र रोज सामोसा खाल्ला तर वजन चांगलेच वाढेल. त्यामुळं वजन कमी करायचे असेल संत्री, हिरव्या भाज्या याच्यापासून कॅलरीज मिळवल्या तर त्या लवकर खर्च होतील आणि वजन नियंत्रणात राहील.

    First published:
    top videos

      Tags: Health Tips, Orange