मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ग्रीन टीमुळे खरंच वजन कमी होतं का?

ग्रीन टीमुळे खरंच वजन कमी होतं का?

Glass cups with green tea and tea leaves isolated on white.

Glass cups with green tea and tea leaves isolated on white.

अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ग्रीन टी प्यायल्यामुळे वजन कमी होतं असं म्हणण्याला काहीही वैज्ञानिक आधार नाही.

    सध्याच्या फास्ट आणि विचित्र लाइफस्टाइलमध्ये (Lifestyle) अनेकांचं वजन वाढतं. कारण जंक फूड मोठ्या प्रमाणावर खाल्लं जातं आणि व्यायाम मात्र फारसा होत नाही. त्यामुळे अनेक जण लठ्ठपणाच्या (Fat) समस्येने ग्रस्त असतात. लठ्ठपणावर मात कशी करायची, याचे उपाय सगळे जण शोधत असतात. कोणी आपल्या ओळखीच्यांना विचारतं, तर कोणी इंटरनेटवर शोधतं. या सगळ्यातून हमखास सल्ला मिळतो तो ग्रीन टी पिण्याचा. ग्रीन टी प्यायल्यामुळे वजन कमी होतं, असा दावा केला जातो. तसंच, ग्रीन टी (Green Tea) प्यायल्यामुळे कॅलरीज (Calories) लवकर खर्च होतात, असा दावाही केला जातो; मात्र हे खरं आहे का, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ग्रीन टी प्यायल्यामुळे वजन कमी होतं असं म्हणण्याला काहीही वैज्ञानिक आधार नाही. हेल्थलाइन (Healthline) या अमेरिकन हेल्थ जर्नलने दिलेल्या माहितीच्या आधारे टीव्ही नाइन हिंदीने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ग्रीन टीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, मँगनीज, सोडियम यांसह बी 1, बी 2, बी 3, बी 6 ही जीवनसत्त्वं (Vitamins) असतात. तसंच, यात प्रथिनं, मेदयुक्त पदार्थ म्हणजे फॅट्स (Fats) आणि कर्बोदकं म्हणजे कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) अजिबात नसतात. ग्रीन टी पिताना पाळायचं पथ्य म्हणजे त्यात साखर (Sugar) किंवा मध न घालता प्यावा. साखरेशिवाय ग्रीन टी प्यायला, तर त्यातून फार कमी कॅलरीज शरीराला मिळतात. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज शरीरात जाण्याची भीती उरत नाही. ग्रीन टीमुळे वजन कमी होत नाही; मात्र आपल्या शरीरातल्या चयापचय (Metabolism Rate) क्रियांचा वेग आणि ऊर्जा यांवर मात्र ग्रीन टीचा चांगला परिणाम होतो, असं 'हेल्थलाइन'मध्ये म्हटलं आहे. कोणतेही तिखट, तेलकट, तुपकट पदार्थ खाल्ल्यानंतर चहा पिण्याची तल्लफ अनेकांना येते. असे पदार्थ खाल्ल्यानंतर साधा चहा पिण्यापेक्षा ग्रीन टी प्राशन करणं शरीरासाठी लाभदायक ठरतं. कारण पचण्यासाठी जड असलेले पदार्थ पचवण्यासाठी ग्रीन टी मदत करतो. आपल्या आतड्यांना जाऊन चिकटलेलं तेल साफ करण्याचं काम ग्रीन टीमुळे केलं जातं. हे ही वाचा-अर्गन ऑईल आहे त्वचेसाठी संजीवनी; पहा किती प्रकारचे होतात Benefits आपल्या शरीरातल्या चयापचय क्रिया व्यवस्थित राखण्याचं काम ग्रीन टीमुळे होतं. चयापचय क्रियांशी लठ्ठपणाचा संबंध असतो. चयापचय क्रिया व्यवस्थितपणे सुरू असल्या, तर शरीराच्या क्रिया व्यवस्थित सुरू राहतात आणि आहारामुळे ऊर्जा (Energy) मिळते. म्हणजेच वेळेवर भूक लागते, वेळेत ते पचवलं जातं आणि मुख्य म्हणजे त्याचं फॅट्समध्ये रूपांतर होत नाही. चयापचय क्रिया सुरळीत नसतील, तर फॅट्स वाढू लागतात. ग्रीन टीमध्येअँटीऑक्सिडंट्स (Anti Oxidants) मोठ्या प्रमाणावर असतात. आधीपासून शरीरात असलेली चरबी कमी करण्याचं काम ग्रीन टी करत नाही; मात्र शरीरात नव्याने चरबी तयार होण्याला प्रतिबंध करण्याचं काम मात्र ग्रीन टीमुळे नक्की केलं जातं, असा निष्कर्ष न्यूयॉर्क मेडिकल रिसर्च सेंटरच्या एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. या सगळ्याचा अर्थ असा, की ग्रीन टी नेहमी आपल्या आहारात असणं चांगलं; पण तुमचं वजन आधीच वाढलं असेल, तर ते कमी करण्यासाठी ग्रीन टीचा काहीही उपयोग नाही. शरीरात आणखी चरबी तयार न होण्यासाठी मात्र ग्रीन टी साह्यभूत ठरतो. हे समजून घेऊन योग्य प्रमाणात ग्रीन टीचा आहारात समावेश करण्यास काही हरकत नसावी.
    First published:

    Tags: Tea, Weight loss, Weight loss tips

    पुढील बातम्या