मुंबई, 20 जुलै : सध्या लोक आपले वजन कमी करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात चरबीयुक्त म्हणजेच फॅट्स असलेल्या पदार्थांचा समावेश करत आहेत. मात्र प्रत्येकाने हे जाणून घेणे महत्वाचे आहे की फॅट्स आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपल्या त्वचेवर चमकही येते. याशिवाय शरीराच्या कार्यात मदत होते. परंतु हे फॅट्स निरोगी आहेत याची खात्री करणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या आहारात फक्त अनसॅच्युरेटेड फॅट्स असलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. कारण हे पदार्थ शरीरासाठी आरोग्यदायी असतात. त्यामुळे शरीरालाही इजा होत नाही. ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात आणि त्यांचे अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे ते टाळावे. आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांबद्दल सांगत आहोत. त्यांचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अॅव्होकाडो हेल्थलाईननुसार या फळामध्ये कार्ब्ससोबत हेल्दी फॅट्सदेखील आढळतात. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाणही असते. ज्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. तुम्ही त्याचे सेवन सुरू करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतील.
Weight Loss Tips : भूक शमवण्यासोबतच वजनही घटवा; दररोज खा हे हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्सचीज हे खूप पौष्टिक आहे आणि हेल्दी फॅट्सचा एक चांगला स्रोत आहे. याशिवाय कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12, फॉस्फरस आणि सेलेनियम यांसारख्या गोष्टीही यामध्ये आढळतात. डार्क चॉकलेट चॉकलेट प्रेमींसाठी चांगली गोष्ट म्हणजे हे चॉकलेट हेल्दी फॅट्सचाही चांगला स्रोत मानले जातात. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते मर्यादित प्रमाणातच खावे. अंडी अंडी खूप पौष्टिक असतात आणि त्यात फॅट्सचे प्रमाण कमी असते पण ते फॅट्स हेल्दी फॅट्स असतात. याव्यतिरिक्त अंडी प्रोटीनचा उत्तम स्रोतदेखील आहेत. अंड्यातील पिवळ बलक काढू नका संपूर्ण अंडे खा.
Parenting Tips : मुलं शाळेत जायला नकार देतायत? मुलांच्या मनातील शाळेच्या भीतीची ‘ही’ असू शकतात कारणंकाजू बदाम, अक्रोड आणि काजू यांसारख्या ड्राय फ्रूट्सना हेल्दी फॅट्स, फायबरचा चांगला स्रोत मानले जाते आणि ते प्रोटीनचेही स्रोत आहेत.

)







