मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /World TB Day : कोरोना काळातील एक चूक आणि टीबीचा उद्रेक; मुंबईची आकडेवारी हादरवणारी

World TB Day : कोरोना काळातील एक चूक आणि टीबीचा उद्रेक; मुंबईची आकडेवारी हादरवणारी

मुंबईत टीबी रुग्णांमध्ये वाढ

मुंबईत टीबी रुग्णांमध्ये वाढ

आज वर्ल्ड टीबी दिनाच्या दिवशी बीएमसीचा मुंबईतील टीबीबाबत धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 24 मार्च : शहरात 2022 मध्ये सर्वाधिक टीबीचे रुग्ण आढळले आहेत. अशातच बीएमसीने टीबीचा प्रसार रोखण्यासाठी हाय-एंड जिनोमिक्स, जलद चाचण्या आणि बेड तसेच लॅबोरेट्रीजची संख्या वाढवली आहे. गुरूवारी जाहीर झालेल्या टीबी रुग्णांच्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की 2022 मध्ये मुंबईत 65,617 प्रकरणं आढळून आली होती आणि सलग तिसऱ्या वर्षी यात महिला रुग्णांची संख्या जास्त होती. 28,629 महिला आणि 27,454 पुरुषांना टीबी झाल्याचं आढळून आलं.

  एका अधिकार्‍याने सांगितलं की 2022 मध्ये सर्वाधिक टीबीचे रुग्ण आढळून येण्यामागे कोविड हे एक मुख्य कारण आहे. "जेव्हा 2020 मध्ये कोविडची सुरुवात झाली, तेव्हा टीबीच्या उपचार आणि निदान करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला," असं BMC च्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. 2019 मध्ये 60,387 चाचण्या झाल्या होत्या त्या 2020 मध्ये 43,224 पर्यंत कमी झाल्या. "परंतु कोविडमध्ये आमच्याकडून टीबीच्या तपासण्या कमी झाल्याचं लक्षात आल्यावर आम्ही गेल्या वर्षी अतिरिक्त प्रयत्न केले," असंही त्या म्हणाल्या.

  Diabetes रुग्णांनी गोड गोड Watermelon खाल्लं तर काय होईल? हा VIDEO पाहिला नाही तर पचतावाल

  सीएसआर निधी किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने टेस्टिंग सुविधांची संख्या वाढवली. तसेच सुरुवातीच्या टप्प्यात आजाराचं निदान करण्यासाठी आर्टिफिशिअल इन्टिलिजन्सवर आधारित एक्स-रे स्कॅन सुरू केले.

  कोविडमुळे अधिक महिला प्रभावित झाल्या आणि त्यांचं निदान झालं, असं तज्ज्ञांनी सांगितलं. लॉकडाउनदरम्यान लोक घरातच होते, त्यामुळे टीबीचा प्रसार झाला. खूप स्त्रियांचा न्युट्रिशनल लॉस झाला, परिणामी त्यांची इम्युनिटी कमी झाली आणि अॅनिमिया झाला. यामुळे त्यांना टीबी होण्याची अधिक शक्यता निर्माण झाली," असं डॉ गोमारे म्हणाले.

  बीएमसीच्या डेटामध्येही एक मोठा बदल दिसून आला आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग-रेझिस्टंट (XDR) रुग्णांची संख्या 2021 मध्ये 111 होती ती 2022 मध्ये नऊवर आली आहे. पण हे डब्ल्युएचओने XDR साठी बदललेल्या व्याख्येमुळे झालंय. आता कमी रुग्ण XDR टॅगसाठी पात्र आहेत, असं डॉक्टर म्हणाले. तसेच, प्री-एक्सडीआर प्रकरणं कमी कालावधीच्या नवीन क्लिनिकल टेस्टिंगमध्ये नोंदवली जात आहेत.

  आश्चर्य! छोट्याशा बाटलीतील पाण्याचा चमत्कार; कॅन्सरसह अनेक आजारांचे रुग्ण ठणठणीत झाल्याचा दावा

  बीएमसीने याआधीच 2,500 रूग्णांच्या जीनोम सिक्वेन्सिंगचा एक प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्या माध्यमातून सर्वात सामान्य स्ट्रेन आणि लाइनएजेसचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून फायदेशीर औषधं बनवण्यासाठी त्याचा वापर करता येईल. इंटरफेरॉन-गॅमा रिलिझ अ‍ॅसे चाचण्या त्वरित टीबीचा शोध लावू शकतात. त्या जुलैपासून अधिक व्यापकपणे उपलब्ध होतील. IGRA लवकर इन्फेक्शन तसंच लेटेंट टीबी केसेस शोधण्यात मदत करेल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. उपनगरीय नागरी रुग्णालयात टीबी रुग्णांसाठी आणखी खाटा वाढवल्या जातील. कस्तुरबा रुग्णालयातील कंटेनरमध्ये कल्चर व ड्रग सेन्सेटिव्हिटी टेस्टिंग लॅब जूनपासून सुरू होईल.

  First published:
  top videos

   Tags: Health, Lifestyle, Mumbai, Serious diseases, TB