विशाल झा/लखनऊ, 23 मार्च : पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं. शरीरात योग्य प्रमाणात पाणी असल्यास आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतात. पण पाण्यानेच आजार बरे झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? अशीच काही प्रकरणं समोर आली आहेत. ज्यात रुग्णांनी आपण पाण्यामुळे ठणठणीत झाल्याचा दावा केला आहे. यात कॅन्सरसह अनेक आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे. यामुळे हे चमत्कारिक पाणी चर्चेत आलं आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये असं चमत्कारिक पाणी असल्याचं सांगितलं जातं आहे. प्रत्येक मंदिराची एक खासियत असते, तिथले बरेच चमत्कार ऐकायला, पाहायला मिळतात. अशाच मंदिरापैकी एक असलेलं हे ‘जलवाला मंदिर’ जिथं प्रसाद म्हणून जल मिळतं. हे जल सामान्य नाही तर जादुई किंवा चमत्कारिक आहे, असं सांगितलं जातं. या मंदिरात देवीची पूजा होते. तिच्या चरणावरील हे जल असतं. खरंच हा ‘कंबल वाले बाबा’चा चमत्कार? रुग्णावर घोंगडी टाकून आजारातून मुक्त केल्याचा दावा जय कुमार शर्मा या मंदिराचे मुख्य महंत आहेत. त्यांना जलवाले गुरूजी म्हणूनही ओळकलं जातं. ते देवीच्या चरणी ठेवलेल्या जलाला अभिमंत्रित करतात. त्यानंतर छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये भरून भक्तांना देतात. ते सांगतात, “या जलाशी भक्तांची आस्था जुडलेली आहे. जेव्हा जगात काहीच नव्हतं तेव्हा जलच होतं. या जलाची खासियत म्हणजे कित्येक वर्षे गंगा जलाप्रमाणे ते अशुद्ध होत नाही. भक्तांना हे जल मातेच्या निर्देशानुसारच वितरित केलं जातं”
हे जल कुणी पितं, तर कुणी याने अंघोळ करतं आणि त्यानंतर शुभ कार्य करतात. या जलाच्या चमत्काराने कॅन्सरसह अनेक आजारांचे रुग्ण बरे झाल्याचा दावा केला जातो आहे. जवळपास 2200 लोकांचा कॅन्सर ठिक झाला, 600 लोकांच्या डोळ्यांची दृष्टी परत आली, 700 पेक्षा जास्त लोक जे लहानपणापासून मुके होते ते बोलू लागले. असे दिव्यांग लोक ठिक झाले ज्यांनी पुन्हा चालण्याची आशाच सोडली होती. तांदळावरून सांगतात भूत आणि भविष्य; चहापाण्यावर जगणारे ‘चावलवाले बाबा’ चर्चेत तुम्हालाही या मंदिरात दर्शनासाठी जायचं असेल तर यूपीतील जोहरी एन्क्लेव मेट्रो स्टेशनवरून या मंदिरापर्यंत तुम्ही रिक्षाने जाऊ शकता.
सूचना - मंदिरासंबंधी मान्यता आणि चमत्कारांचं समर्थन News 18 Local करत नाही. आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.