जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / महिलांनो वजन कमी-जास्त करण्याऐवजी 'या' गोष्टी करा; आपोआप Weight ही कंट्रोलमध्ये राहिल

महिलांनो वजन कमी-जास्त करण्याऐवजी 'या' गोष्टी करा; आपोआप Weight ही कंट्रोलमध्ये राहिल

महिलांसाठी वजन नियंत्रित ठेवण्याच्या टिप्स

महिलांसाठी वजन नियंत्रित ठेवण्याच्या टिप्स

बारीक किंवा सडपातळ असणं हेच निरोगी असण्याचं एकमेव उद्दिष्ट असू शकत नाही.

  • -MIN READ Trending Desk Bangalore,Bangalore,Karnataka
  • Last Updated :

    मुंबई, 18 फेब्रुवारी :  गेल्या काही वर्षांत, सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे सेलिब्रिटी-स्टाईल बॉडीजचा ट्रेंड वाढला आहे. परिणामी, फॅड डाएट किंवा अनहेल्दी डाएट, सेल्फ-स्टाईल वर्कआउट्स फॉलो करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ज्याचे फायद्यापेक्षा दुष्परिणाम जास्त आहेत. बारीक किंवा सडपातळ असणं हेच निरोगी असण्याचं एकमेव उद्दिष्ट असू शकत नाही. पण, दुर्दैवानं अशा ट्रेंडमुळे अनेक स्त्रिया आता फिटनेसला वजन कमी करण्याशी जोडतात. अलीकडे स्त्रियांमधील ‘बॉडी इमेज इश्यू’ मध्ये वाढ झाली आहे. कारण, जोडप्यांमधील वंध्यत्वाच्या समस्येमुळे बहुतेक स्त्रियांच्या शरीराच्या ठेवणीची थट्टा केली जाते. परिणामी, अशा स्त्रिया आपल्या शरीराच्या वजनाबद्दल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि उदास होतात. त्या झटपट रिझल्ट देणाऱ्या गोष्टींचा अवलंब करण्यास तयार होतात. अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की, त्या स्वत: अद्वितीय आणि सुंदर आहेत. फक्त वजन कमी केल्यास त्यांना निरोगी आयुष्य मिळू शकत नाही. एखाद्या व्यक्तीचं वजन इतरांपेक्षा जास्त असू शकतं आणि तरीही ती व्यक्ती निरोगी राहू शकते. वजन हा फक्त एक आकडा आहे. तुमची शरीररचना महत्त्वाची आहे. अशी रचना जी तुमच्या शरीरातील स्नायू, शरीरातील चरबी आणि चयापचय प्रकाराची टक्केवारी मोजते. त्यामुळे, वजन कमी करण्यापेक्षा किंवा वाढवण्यापेक्षा निरोगी राहण्यावर जास्त भर दिला पाहिजे. त्यासाठी खालील टिप्स उपयुक्त ठरू शकतात: हे वाचा -  आश्चर्य! दररोज 3 Pizza खाऊन तरुणाने 30 दिवसांत घटवलं वजन; कसं शक्य झालं तुम्हीच पाहा दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाणी पिऊन करा आणि दिवसभर हायड्रेटेड राहण्यावर भर दिला पाहिजे. तुम्हाला मळमळ होत असेल तर तुम्ही लिंबू किंवा फळांचा अर्क पाण्यात टाकू शकता. या शिवाय, गार्डन क्रेस सीड्स किंवा चिया सिड्स पाण्यात भिजवून ते पिऊ शकता. याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. अलीकडच्या काळात झालेल्या संशोधनातील डेटानुसार, नाश्ता टाळण्याची सवय ही वजन वाढणं किंवा लठ्ठपणा, हृदयरोग आणि मृत्यूचा धोका वाढवण्याशी संबंधित आहे. पौष्टिक नाश्ता तुम्हाला संपूर्ण दिवस उत्साही ठेवू शकतो आणि तुमच्या दैनंदिन पोषण गरजा पूर्ण करण्यासाठी तो महत्त्वपूर्ण आहे. हाडांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी पुरेशा प्रमाणात कॅल्शियमचं सेवन केलं पाहिजे. जसजसं वय वाढतं तसतसं शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. इस्ट्रोजेन हे शरीरातील एक रक्षणकर्ता संप्रेरक आहे जे स्त्रियांच्या रजोनिवृत्तीपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतं. त्याच्या उपस्थितीमुळे हाडांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. म्हणूनच, मजबूत हाडं मिळविण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचं पुरेस सेवन करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही दही, बदामाचं दूध, सोया आणि त्याचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, हाडं असलेले मासे, जर्दाळू, तीळ इत्यादी खाद्यपदार्थ खाऊ शकता. हे वाचा -  वजन वाढेल म्हणून घाबरत खाणे सोडा, तज्ज्ञांनी सांगितली निरोगी आयुष्य जगण्याची सोपी पद्धत स्त्रियांनी त्यांच्या पुनरुत्पादनाच्या काळात (आई होण्यास सक्षम असल्याचा काळ) लोह, मॅग्नेशियम, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी 12 सारखे मुख्य पोषक घटक योग्य प्रमाण शरीराला मिळावेत यासाठी संतुलित आहार घेतला पाहिजे. तुमच्या शरीराला प्रोटिन्स, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स पुरवणारा पौष्टिक व संतुलित आहार निरोगी राहण्यास मदत करू शकतो. भाज्या, फळं आणि धान्य असलेल्या आहाराला संतुलित आहार म्हटलं जातं. या व्यतिरिक्त, जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि साखर कमी खाल्ली पाहिजे. कारण, त्यामुळे हृदयरोग आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. स्त्रियांनी धूम्रपान आणि अल्कोहोलचं सेवन कमी केलं पाहिजे. धुम्रपान आणि अल्कोहोल तुमच्या हार्मोन्समध्ये व्यत्यय आणू शकतात. तुमचं आरोग्य आणि शरीराची ठेवणं नियंत्रित करणं कठीण होऊ शकतं. निरोगी शरीरासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. चालणं, जॉगिंग, धावणं, जीममध्ये जाणं किंवा आठवड्यातील पाच दिवस दिवसातून 30 मिनिटं योगासनं करणं, या पैकी कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. यामुळे तुमचं वजन कमी करण्यात आणि तुमचं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य वाढवण्यात मदत होऊ शकते. हे वाचा -  प्रेग्नन्सीनंतर आलिया-करिनाने या सोप्या पद्धतीने केला वेट लॉस, तुम्हीही करू शकता ट्राय प्रत्येक स्त्रीनं नियमित आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. बाळंतपणापासून रजोनिवृत्तीपर्यंत, स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. म्हणून, अशी शिफारस केली जाते की, 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनी नियमित बॉडी स्क्रीनिंग टेस्ट केल्या पाहिजेत. एक स्त्री म्हणून, तुम्ही तुमच्या आरोग्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. लेखिका - मिस. एडविना राज, प्रमुख - क्लिनिकल न्यूट्रिशन डायटेटिक्स, अ‍ॅस्टर सीएमआय हॉस्पिटल, बंगळुरू

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात