मुंबई, 09 फेब्रुवारी : वजन घटवण्यासाठी तुम्ही एक्सरसाइझ, योगा, जीम, डाएट असं काय काय करत नसाल. अगदी आपल्या आवडत्या पदार्थांवरही पाणी फेरता. इच्छा असूनही हे पदार्थ खाण्यापासून स्वतःला रोखता. विशेषतः वजन घटवणं म्हटलं की बर्गर, पिझ्झा अशा जंक फूडपासून लांबच राहा, असा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल पिझ्झा खाऊनच एका तरुणाने वजन घटवलं आहे.
आयर्लंडमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने पिझ्झा खाऊन वजन घटवल्याचा दावा केला आहे. रयान मर्सर असं या व्यक्तीचं नाव आहे. तो एक पर्सनल ट्रेनर आहे. त्याने वजन घटवण्यासाठी 30 दिवसांचं चॅलेंज घेतलं होतं. जानेवारी महिन्यात तो दररोज तीन वेळा पिझ्झा खात होता. सकाळी नाश्त्याला, दुपारी लंचला आणि रात्री डिनरलाही त्याने पिझ्झाच खाल्ला आणि महिनाअखेर म्हणजे 30 दिवसांनी त्याला त्याचा आश्चर्यकारक परिणाम दिसला. त्याचं वजन कमी झालं होतं. आता हे कसं शक्य झालं हेसुद्धा या तरुणाने सांगितलं आहे.
हे वाचा - अशा पद्धतीने चॉकलेट-बिस्कीट खा, कमी होईल वजन; तज्ज्ञांनी दिला Weight loss चा एकदम सोपा फॉर्म्युला
पिझ्झा हा त्याच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. त्यामुळे पूर्ण महिनाभर त्याने तो खाल्ला. पण पिझ्झा वेगवेगळ्या प्रकारचे होते. दररोज दोन पिटा पिझ्झा आणि एक मोठा डोवाला पिझ्झा होता. म्हणजे जवळपास पिझ्झाच्या 10 स्लाइस. त्याच्या आहारात फळं आणि भाज्या 7 ते 10 टक्के आणि भरपूर प्रमाणात प्रोटिन असतं. सोमवार ते शुक्रवार दररोज 1900 ते 2100 कॅलरी सेवन करतो. शनिवारी आणि रविवार या दोन दिवसात 2700 कॅलरी घेतो. याशिवाय दररोज 140 ग्रॅम प्रोटिन घ्यायचा. याशिवाय फळं आणि भाज्याही घ्यायचा.या कालावधीत त्याने पिझ्झाव्यतिरिक्त इतर जंक फूड खाणं टाळलं.
या डाएटमुळे त्याच्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल मसल्समध्ये बदलले. मर्सर म्हणाला, माझा उद्देश फक्त कॅलरी इनटेक आणि त्यामुळे होणारा फॅट लॉस दर्शवणंच नाही. तर वेट लॉससासाठी फेव्हरेट फूड टाळण्याची गरज नाही, हे दाखवणं आहे. चांगल्या परिणामांसाठी आवडते पदार्थ सोडण्याची गरज नाही. उलट स्वतःचं अन्न स्वतः बनवून खायला हवं.
हे वाचा - Pizza world record : बाबो! इतका मोठा पिझ्झा की झाला वर्ल्ड रेकॉर्ड; पण तयार केला तरी कसा पाहा VIDEO
तुम्हाला हे आकर्षक वाटेल पण प्रत्येक व्यक्तीची वेट लॉस जर्नी वेगळी असतो. माझा वेट लॉस डाएट कदाचित दुसऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त नसेल. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची संरचना वेगळी असते. त्यामुळे तुमच्या शरीराची साथ मिळेल असाच डाएट फॉलो करायला हवा, असा सल्लाही त्याने दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.