मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वजन वाढेल म्हणून घाबरत खाणे सोडा, तज्ज्ञांनी सांगितली निरोगी आयुष्य जगण्याची सोपी पद्धत

वजन वाढेल म्हणून घाबरत खाणे सोडा, तज्ज्ञांनी सांगितली निरोगी आयुष्य जगण्याची सोपी पद्धत

वजन कमी करण्यासाठी लोक कठोर आहार आणि तीव्र व्यायामाद्वारे अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी करण्यासाठी लोक खूप मेहनत करतात. मात्र असे करणे तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी चांगले असते का?

वजन कमी करण्यासाठी लोक कठोर आहार आणि तीव्र व्यायामाद्वारे अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी करण्यासाठी लोक खूप मेहनत करतात. मात्र असे करणे तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी चांगले असते का?

वजन कमी करण्यासाठी लोक कठोर आहार आणि तीव्र व्यायामाद्वारे अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी करण्यासाठी लोक खूप मेहनत करतात. मात्र असे करणे तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी चांगले असते का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 फेब्रुवारी : आजच्या काळात, लोक काय खावे आणि कसे व्यायाम करावे याबद्दल खूप जागरूक झाले आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा त्यांच्या वजनाचा आणि बेली फॅटचा प्रश्न येतो तेव्हा लोक अधिक विचार करतात. मग वजन कमी करण्यासाठी कठोर आहार आणि तीव्र व्यायामाद्वारे अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी करण्यासाठी लोक खूप मेहनत करतात. मात्र असे करणे तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी चांगले असते का?

न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लोकांच्या विचर करण्याच्या पद्धतींबद्दल आणि त्यामुळे लोक कसे आहारात बदल करतात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ऋजुता यांनी लिहिले की, मराठीतील एका म्हणीप्रमाणे आपली ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असायला हवी. म्हणजेच कमी खावे आणि मोठा विचार करावा, साधेपणाने जगणे आणि महान गोष्टी साध्य करणे. पण जगण्यासाठी आपल्याला खावेच लागते आणि गेल्या २० वर्षांत अन्नाबद्दलचा गोंधळ वाढत चालला आहे.

तुम्ही देखील चहासोबत ब्रेड खाता का? मग सावधान! यामुळे आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान

हल्ली लोक आपल्या आरोग्याविषयी आणि वाढत्या वजनाच्या बाबतीत खूप जागरूक झाले आहेत. वाढत्या वजनाची तर लोकांना विशेष काळजी असते. मात्र त्यामुळे प्रत्येकजण अन्न भीत-भीत खातो. म्हणजे हे खावे की नाही ते खावे का? आणि बहुतेकवेळा लोकांना पाडावेत प्रश्न म्हणजे 'मी खूप कार्ब खात आहे का? मला अधिक प्रोटीन, अधिक अँटिऑक्सिडंट्स, अधिक फायबर, अधिक इतर घटक मिळेल?'

या अधिक अधिकच्या नादात आपण लोकांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडतो आणि महागडी उत्पादने वापरून पैसे आणि वेळी घालवतो. जो परिणाम भिजवलेले बदाम खाऊन मिळणार आहे. त्यासाठी आपण महागडे बदाम दूध खरेदी करतो. अशाच प्रकारे इतरही गोष्टी असतात.

निरोगी आयुष्य जगण्याची सोपी पद्धत

ऋजुता यांचे मत आहे की, मोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी, आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी, आपण प्रथम हे मान्य केले पाहिजे की आपण येथे मर्यादित काळासाठी आहोत. तुम्ही किती पातळ होता हे कोणालाच आठवणार नाही पण तुम्ही इतरांना कधी वागणूक देता हे त्यांच्या कायम लक्षात राहते.

फक्त पाणी पिऊनही High BP नियंत्रित ठेवता येते, ही सोपी पद्धत समजून घ्या

त्यामुळेच हेच केवळ सत्य आहे की, घरी बनवलेले अन्न हाच निरोगी आयुष्यासाठी उत्तम पर्याय आहे. घरी बनवलेले साधे आणि स्वादिष्ट पदार्थ तुम्हाला भरपूर ऊर्जाही देतात आणि तुमच्या शरीरासाठी ते हानिकारक ठरत नाहीत.

ऋजुता यांचे असेही मत आहे की, माणसाने स्वतःला बाह्य रुपावरुन पाहण्यापेक्षा अंतर्गत व्यक्तिमत्वाची काळजी घ्यावी आणि ते सुंदर बनवण्याचा प्रयत्न करावा.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips