तिरुवनंतपुरम 03 मार्च : प्रत्येकाला पोटाच्या वेदना कधी ना कधी होतात. कित्येक लोक त्याला गॅस, अपचन किंवा सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतं. काही घरगुती उपचार करून किंवा पेनकिलर घेऊन वेदनेपासून आराम मिळवतं. पण तरी पोटाच्या वेदना पूर्णपणे जात नाहीत. तरी लोक त्या सहन करत राहतात. अशीच एक महिला जिने एक-दोन नव्हे तब्बल पाच वर्षे पोटदुखी सहन केली. त्यानंतर तिने सिटी स्कॅन केला तर तिला धक्काच बसला. केरळच्या तिरुवनंतपुरमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. कोझिकोडमध्ये राहणारी महिला, जिचं नाव हर्षिना असं आहे. 2017 साली तिने तिसऱ्या मुलाला जन्म दिला. 30 नोव्हेंबर 2017 साली तिचं सिझेरियन डिलीव्हरी झाली. तेव्हापासून तिच्या पोटात वेदना होत होत्या. तिने बरेच उपचार केले पण तरी वेदना कमी होत नव्हत्या. अखेर तिचं सिटी स्कॅन करण्यात आलं. त्यात जे दिसलं ते पाहून ती हादरलीच. तिच्या पोटात चक्क कात्री दिसली. Bread खाताय, सावधान! पावाच्या छोट्याशा तुकड्याने घेतला बॉडीबिल्डरचा जीव; कारण… कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये तिची डिलीव्हरी झाली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये याच रुग्णालयात सर्जरी करून तिच्या पोटातील कात्री बाहेर काढण्यात आली. 11 सेमी लांब ही कात्री आहे.
आता ही कात्री तिच्या पोटात गेली तरी कशी? कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ही कात्री तिच्या पोटात राहिली, असा आरोप तिने केला आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या टिमने याप्रकरणी दुसऱ्यांदा रिपोर्ट दिला ज्यात रात्री कोझिकोड कॉलेज रुग्णालयाची नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोझिकोड रुग्णालयाचा निष्काळजीपणा आहे, असं म्हणायला पुरावे नाहीत, असं या रिपोर्टध्ये म्हणण्यात आलं आहे. वजन कमी करण्याची ही पद्धत महिलेच्या जीवावर बेतली; एक चूक आणि झाला मृत्यू या रिपोर्टमुळे हर्षिना संतप्त झाली आहे. हर्षिना म्हणाली, “या रिपोर्टचा अर्थ काय? काय मी कात्री गिळली आहे?, असा सवाल तिने केला आहे.
पोटाच्या वेदनेने त्रस्त महिलेच्या पोटात कात्री; केरळमधील धक्कादायक प्रकार. pic.twitter.com/00oz97eaMJ
— News18Lokmat (@News18lokmat) March 3, 2023
आता ती रुग्णालयाबाहेर आंदोलनाला बसली आहे. न्याय मिळेपर्यंत मी विरोध करत राहणार, असं ती म्हणाली.