जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / वजन कमी करण्याची ही पद्धत महिलेच्या जीवावर बेतली; एक चूक आणि झाला मृत्यू

वजन कमी करण्याची ही पद्धत महिलेच्या जीवावर बेतली; एक चूक आणि झाला मृत्यू

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

वजन घटवण्याच्या नादात महिलेने आपला जीव गमावला आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

कॅराकस, 03 मार्च : वाढतं वजन, लठ्ठपणामुळे यामुळे कित्येक लोक हैराण झाले आहेत. विशेषतः महिला. थोडं जरी वजन वाढलं तरी ते कमी करण्यासाठी काय काय उपाय केले जातात. व्यायाम म्हणू नका, डाएट म्हणू नका… पण वजन खूपच जास्त असेल आणि या कोणत्याच उपायांनी घटत नसेल तर मग इतर वैद्यकीय उपचारांचा अवलंब केला जातो. असाच उपचार एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. वजन घटवण्यासाठी ती डॉक्टरांकडे गेली. पण एक चूक तिची जीवावर बेतली.

जाहिरात

दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेजुएलातील हे प्रकरण आहे. 31 वर्षांची एना रोजा मावरेज रिवरो. तिच्या शरीरावर खूप चरबी होती. अखेर तिने वजन कमी करण्याचा जो मार्ग निवडला तो तिच्या जीवावर बेतला. उपचारानंतर

काही वेळातच तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, श्वास कोंडू लागला आणि आता अखेरची वेळ जवळ आली असं तिला वाटू लागलं. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले पण तिला वाचवता आलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार तिच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

Bread खाताय, सावधान! पावाच्या छोट्याशा तुकड्याने घेतला बॉडीबिल्डरचा जीव; कारण…

एनाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलं ते तिने वजन घटवण्यासाठी निवडलेल्या मार्गातील एक चूक आणि ही चूक डॉक्टरांकडूनच झाली. तिने लिपोसक्शन सर्जरी केली होती. माय उपचारने दिलेल्या माहितीनुसार हे एक लेझर ट्रिटमेंट आहे. यामाध्यमातून शरीराच्या वेगवेगळ्या भागातील अतिरिक्त फॅट हटवता येतं. ही प्रक्रिया सामान्यपणे पोट, कंबर, मांड्या, गळा आणि हनुवटीखालील भागात केली जाते. एका वेळी पाच लीटर फॅट हटवता येतं. जिथलं फॅट काढायचं आहे, तिथं एक चीर दिली जाते आणि छोटी ट्युब लावली जाते. ज्यात वॅक्युम सक्शनमार्फत चरबी बाहेर काढली जाते.

वजन घटवण्यासाठी अशा सर्जरी धोकादायकच असतात. पण प्रशासनाच्या मते या प्रकरणात डॉक्टरांचा बेजबाबदारपणा आढळून आला आहे. त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  VIDEO - एका महिलेची एक सवय अख्ख्या जगाला भारी पडणार; सर्वात भयानक संकटाचा धोका

 ज्यांचं वजन व्यायाम, डाएट किंवा इतर मार्गांनी कमी होऊ शकत नाही, त्यांच्यावर ही सर्जरी केली जाते.जेव्हा तुम्ही पूर्णपणे फिट असाल तेव्हाच डॉक्टर ही सर्जरी करण्याचा सल्ला देतात. जे लोक धूम्रपान करतात, त्यांना ही सर्जरी करण्याचा सल्ला दिला जात नाही कारण त्यांना बरं होण्यात बराच कालावधी जातो. जे लोक अॅनेस्थिशिया घेऊ शकत नाही त्यांनाही ही सर्जरी करू नये असं सांगितलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात