पियुष पाठक, प्रतिनिधी अलवर, 20 जून : उद्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाईल. या दिनी सर्वत्र लोक योग करताना पाहायला मिळतील. हा दिवस साजरा करायला 2015 पासून सुरुवात झाली. 21 जून हा उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने आणि जगाच्या अनेक भागांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जागतिक योग दिनासाठी ही तारीख निवडण्यात आली. योगाच्या विविध शैलींमध्ये शारीरिक मुद्रा, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ध्यान यांचा समावेश असतो. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘मानवतेसाठी योग’ अशी आहे. राजस्थानच्या अलवर शहरात उद्याने आणि शाळांमध्ये दररोज सकाळ, संध्याकाळ योग दिवसाची तयारी केली जातेय. शहरातील उद्याने आणि केंद्रांवर योग तज्ज्ञ लोकांना योगा शिकवतात. योग तज्ज्ञ सुनील शर्मा यांनी सांगितलं की, आजकाल लोकांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. लोक आवडीने योगा करतात, परंतु माहितीअभावी योग्य आसने केली जात नाहीत. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं, सकाळी 4:30 ते 6:30 वाजताची वेळ योगासने करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते. मात्र ज्यांना सकाळी शक्य होत नाही, त्यांनी दुपारचं जेवण आणि योगासनांमध्ये किमान साडे सहा तासांचं अंतर असेल अशावेळी योगासने करावी.
सुनील सांगतात, योगा करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अन्यथा शरीराला इजा होऊ शकते. योगा करताना चेहरा नेहमी पूर्व दिशेला असावा. योगामुळे मन शांत होतं. 6 ते 8 वर्षांच्या मुलांनी सुमारे 2 ते 4 मिनिटं एक आसन करावं, 8 ते 10 वर्षांच्या मुलांनी 5 ते 10 मिनिटांसाठी 1 आसन करावं आणि 10 वर्षांवरील सर्व लोकांनी 10 ते 15 मिनिटांसाठी 1 आसन करावं. ‘मला कुत्र्यासारखं हाकलून दिलं…’ दबंग 3 मधील अभिनेत्रीचा सलमानच्या सुरक्षा रक्षकांवर आरोप आजकाल प्रत्येकजण योगासने करतो परंतु ते कधी करावं हे अनेकजणांना कळत नाही. नुकतीच शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, मेंदूची शस्त्रक्रिया किंवा इतर कोणताही आजार झालेल्या व्यक्तींनी काही काळ योगासने करू नये, त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र अशीही काही योगासने आहेत जी रोगात फायदेशीर ठरतात, मात्र ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावीत. योगासने केल्यानंतर सुमारे 15 मिनिटांनी आंघोळ करावी. त्यामुळे आपलं शरीर उबदार राहतं आणि आपण लगेच आंघोळ केल्यास काही आजार जडू शकतात. या गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.