मुंबई, 20 जून : सलमानचा ‘दबंग 3’ हा चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री कतरीना कैफ झळकणार आहे. पण आता या चित्रपटातील अजून एका अभिनेत्रीनं सलमानबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री हेमा शर्माने सलमान खानविरोधात धक्कादायक दावा केला आहे. या अभिनेत्रीने भाईजानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हेमाने असा दावाही केला आहे की, तिला सेटवर कुत्र्यासारखं हाकलून दिलं, आणि अपमानित केलं. अभिनेत्रीचे हे विधान समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हेमा शर्माने सांगितलेली ही घटना 2019 मधील आहे. ती घटना आठवून हेमा शर्मा भावूक झाली. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानला पुन्हा कधीही भेटायला आवडणार नाही असं विधान केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मला दबंग 3 मध्ये काम करायचे होते आणि मी त्या चित्रपटात काम करण्यासाठी माझ्या क्षमतेनुसार सर्वकाही केले कारण मला सलमान खान सरांना भेटायचे होते.’
शूटिंगच्या क्षणांची आठवण करून देताना हेमा पुढे म्हणाली, ‘माझा पहिला सीन सलमान सरांसोबत होता. त्याचा मला खूप आनंद झाला.’ मात्र, हेमा ज्या सीनमध्ये दिसली ते सलमानशिवाय शूट करण्यात आले, त्यामुळे तिची खूप निराशा झाली. अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘शूट संपल्यानंतर मला एकदा सलमान सरांना भेटायचे होते.’ सलमान खानला भेटण्याची संधी मिळावी यासाठी तिने अनेक लोकांशी संपर्क देखील केल्याचं हेमाने सांगितलं. Salman Khan: दीपिका ते कंगना; या अभिनेत्रींनी सलमानसोबत काम करायला दिला साफ नकार; काय होतं कारण? हेमा शर्मा एवढ्यावरच थांबली नाही तर तिने अजून एक मोठा दावा केला आहे. तिने ‘सलमान सरांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एक फोटो क्लिक करण्यासाठी मी 50 लोकांशी बोलले. यानंतर मी पंडित जनार्दन यांची भेट घेतली आणि सलमान सरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने मला आश्वासन दिले की ते होईल आणि आम्ही सलमान सरांना भेटायला गेलो. मात्र, हेमाने मुलाखतीत मोठा खुलासा करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘तिथे मला किती वाईट वागणूक मिळाली आणि माझा किती अपमान झाला हे मी सांगू शकत नाही. सलमानच्या सुरक्षारक्षकांनी मला कुत्र्यासारखे बाहेर फेकले गेले कारण मला त्याच्यासोबत फोटो काढायचे होते. सुमारे १०० लोकांसमोर माझा अपमान झाला, ज्यात मला वैयक्तिकरित्या ओळखणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. या घटनेनंतर मी 10 दिवस झोपू शकले नाही. सलमान सर घटनास्थळी उपस्थित नव्हते, पण ते आजूबाजूला होते, त्यांना वाटले असते तर ते हस्तक्षेप करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही.’ असं ती म्हणाली आहे. अभिनेत्रीनं केलेल्या या विधानाची आता चर्चा होत आहे.