जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / जगातील 99.99% लोकांवर मोठं संकट; फक्त इथले लोक आहेत सुरक्षित

जगातील 99.99% लोकांवर मोठं संकट; फक्त इथले लोक आहेत सुरक्षित

जगातील 99.99% लोकांवर मोठं संकट; फक्त इथले लोक आहेत सुरक्षित

आजही अनेक जण मृत्यूच्या छायेत जीवन जगत आहेत.

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 21 एप्रिल : वाढतं औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे प्रदूषणा त वाढ झाली आहे. वायू, जल प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदलामुळे समस्यांमध्ये आणखी भर पडत आहे. वायू प्रदूषणामुळे हवेचा दर्जा कमालीचा खराब झाला असून, यामुळे अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. शुद्ध हवेत श्वास घेणं हा जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. वाढत्या प्रदूषणामुळे हा हक्क हिरावला जात आहे. आजही अनेक जण मृत्यूच्या छायेत जीवन जगत आहेत. जगातल्या 99.99 टक्के नागरिकांकडून त्यांचा हा मौल्यवान मानवी हक्क कसा हिरावला जात आहे, याबाबत जाणून घेऊ या. 26 जुलै 2022 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानुसार स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरण हा मानवी हक्क म्हणून घोषित करण्यात आला. याचाच अर्थ स्वच्छ आणि शुद्ध हवेत श्वास घेणं हा जगातल्या प्रत्येक माणसाचा मानवी हक्क आहे. या प्रस्तावाला भारतानेही पूर्ण पाठिंबा दिला होता. 14 डिसेंबर 2022 रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त बोलताना सांगितलं, की `स्वच्छ हवेत श्वास घेणं हा मूलभूत मानवी हक्क आहे.`

    News18लोकमत
    News18लोकमत

    एकीकडे हा निर्णय असला तरी दुसरीकडे वास्तव खूप भीषण आहे. आज भारतासह संपूर्ण जगाची परिस्थिती अशी आहे, की 99.999 टक्के लोकसंख्येला वर्षभर शुद्ध हवा मिळत नाही. नागरिकांना विषारी हवेत श्वास घ्यावा लागत असल्याचं वास्तव आहे. 99.999 टक्के लोकसंख्या म्हणजेच 793 कोटी नागरिकांना विषारी हवेत श्वास घ्यावा लागत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या लॅन्सेट अभ्यास अहवालानुसार, जगातले केवळ 0.001 टक्के नागरिक भाग्यवान असून, ते वर्षभर स्वच्छ हवेत श्वास घेऊ शकत आहेत. तुमचा मृत्यू कधी, जास्त जगण्यासाठी काय करायचं? तुमचं आयु्ष्य सांगणारं अनोखं कॅल्युलेटर विषारी हवेत श्वास घेतल्याने भारतात दर वर्षी 16.5 लाख नागरिकांचा मृत्यू होतो. विषारी हवेत श्वास घेतल्याने मृत्यू होणाऱ्या जगातल्या प्रत्येक चार जणांपैकी एक भारतीय आहे. भारतातल्या सहा शहरांचा जगातल्या टॉप 10 प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ज्याप्रमाणे स्वच्छ हवेत श्वास घेणं हा मानवी हक्क म्हणून घोषित केला आहे, त्याचप्रमाणे आता भारतानेही असा निर्णय घोषित करून भारतीय येत्या किती वर्षांत स्वच्छ हवेत श्वास घेऊ शकतील हे ठरवणं गरजेचं आहे. लॅन्सेटच्या अभ्यासात संशोधकांनी सांगितलं, की त्यांनी 1 जानेवारी 2000 ते 31 डिसेंबर 2019 म्हणजेच 20 वर्षं जगातल्या 65 देशांमधल्या 5446 स्टेशन्सच्या दैनिक पीएम 2.5 हवेच्या गुणवत्ता पातळीचं विश्लेषण केलं. त्यानंतर संशोधकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या जनरल एअर क्वालिटी लेव्हल स्केलशी 65 देशांच्या जागतिक हवा गुणवत्ता पातळीची तुलना केली. तेव्हा असं दिसून आलं, की जगातली केवळ 0.001 टक्का लोकसंख्या वर्षभर स्वच्छ हवेत श्वास घेते. वायू प्रदूषण लावतंय तुमच्या हाडांची वाट! नवीन अभ्यासात धक्कादायक खुलासे जागतिक आरोग्य संघटनेच्या पीएम 2.5 एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात एक्यूआयच्या सामान्य पातळीचं प्रमाण असं आहे, की एखाद्या ठिकाणचं सरासरी पीएम 2.5 एक्यूआय एका वर्षात 5 µg/m3 (5mu-gram/per metre cube) पेक्षा जास्त नसावं. डब्ल्यूएचओनुसार, सरासरी पीएम 2.5 एक्यूआय पातळी 15 µg/m3 (15 mu-gram/Per Metre Cube) पेक्षा जास्त नसावी. जे रोज पीएम 2.5 एक्यूआय पातळी 100-200 असताना जगतात, त्यांना एक्यूआय 100पेक्षा कमी असेल तर ती हवा चांगली असं वाटत असेल. उदाहरणार्थ, आजूबाजूला कचरा पडलेला असेल तर तुम्हाला दुर्गंधी येऊ लागल्यावर किळसवाणं वाटेल. कचरा थोडा असेल तर तुम्ही त्याकडे लक्षही देणार नाही; पण हा कचरा कमी असो अथवा जास्त, तो तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्याचप्रकारे एक्यूआय 100 किंवा त्याहून कमी असेल, तर तुम्हाला तो 200, 300, 400 किंवा 500 पेक्षा कमी धोकादायक वाटेल. कारण यामुळे तुमच्या शरीराचं गंभीर नुकसान होत आहे, याची तुम्हाला जाणीवदेखील होणार नाही. हे आहेत वृक्षरुपी ऑक्सिजन सिलेंडर; वाढतं तापमान, कोरोनामुळे लक्षात आलंय महत्त्व त्याचप्रमाणे पीएम 2.5 इतका सूक्ष्म आहे की तो दिसत नाही. परंतु, त्यातला विषारी घटक डोळे, नाक, तोंडातून सहज शरीरात प्रवेश करतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, दमा, फुफ्फुसाचा कर्करोग असे अनेक जीवघेणे आजार होतात. विषारी हवेत श्वास घेतल्याने दर वर्षी 66 लाख 70 हजारांहून अधिक जणांचा अकाली मृत्यू होतो, असंही लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. या अहवालानुसार, ज्या व्यक्ती नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात राहतात, नेहमी शुद्ध आणि ताज्या हवेत श्वास घेतात, केवळ तेच भाग्यवान आहेत. अशांना अकाली मृत्यूचा धोका जवळपास नगण्य असतो, असं वृत्त झी न्यूज हिंदीने दिलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात