मुंबई, 20 एप्रिल : आपल्या आयुष्याची दोरी किती मोठी आहे हे कुणालाच सांगता येत नाही. अनेकांना त्यांच्या शरीरात कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत हे माहिती नसते. एका डॉक्टरने एक अनोखा कॅल्क्युलेटर तयार केला आहे. कोणीही व्यक्ती तिच्या रूढ जीवनशैलीने जगत राहिली तर किती वर्षांनी त्या व्यक्तीचा मृत्यू होईल हे तो कॅल्क्युलेटर अगदी क्षणात सांगतो. एवढंच नाही तर कोणत्या गोष्टी वर्ज्य केल्या तर संबंधित व्यक्तीचं आयुष्य किती वाढेल म्हणजेच ती व्यक्ती किती जास्त जगू शकेल हेदेखील हा कॅल्क्युलेटर सांगतो. अमेरिकेतले डॉ. थॉमस पर्ल्स यांनी `लिव्हिंग टू 100 लाइफ एक्सपेक्टन्सी कॅल्क्युलेटर` तयार केला आहे. अनेकदा अशी तक्रार केली जाते, की आरोग्य चांगलं असूनही आपण किती काळ जगू हे कोणाला माहिती नसतं, अशा व्यक्तींसाठी हा कॅल्क्युलेटर एक वरदान आहे. कोणाला कधी मृत्यू येईल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. परंतु, तुम्ही किती काळ जगू शकाल हे तुमच्या जीवनशैलीवरून समजू शकतं, असं ते म्हणाले.
यासाठी डॉ. पर्ल्स यांनी 40 प्रश्न तयार केले आहेत. या प्रश्नांवरून आयुष्याचं गणित मांडलं जातं. यामध्ये तुम्ही काय खाता, तुमच्या सवयी काय आहेत, तुम्ही धूम्रपान करता की नाही, सनस्क्रीनचा वापर करता का, तुमची कौटुंबिक स्थिती कशी आहे, नात्यात कोणता तणाव तर नाही ना, आदी घटकांचा या प्रश्नावलीत समावेश आहे. कुठे पितात पॉटी ज्युस तर कुठे उंदरांची वाईन; वाचूनच उलटी येईल असे 5 अजब ड्रिंक्स `इनसाइडर`च्या वृत्तानुसार, डॉ. पर्ल्स म्हणाले, की `LivingTO100.com या वेबसाइटवरच्या कॅल्क्युलेटरमध्ये या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी मला 10 मिनिटं लागली. यात मला कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशरच्या रीडिंगची माहिती द्यावी लागली. तसंच मी तणावाचा सामना करतोय की नाही हेदेखील सांगावं लागलं. याशिवाय आठवड्याची दिनचर्या कशी आहे, कुटुंबीयांशी संबंध कसे आहेत, किती वेळा जेवतो, कोणते पदार्थ खातो, व्यायाम करतो की नाही, कँडी किती वेळा खातो, असे प्रश्नही मला विचारले गेले.` या प्रश्नांवरून शेवटी जे उत्तर मिळालं ते आश्चर्यजनक होतं. कॅल्क्युलेटरने सांगितलं की मी 96 वर्षांपर्यंत जगू शकेल. डॉ. पर्ल्स म्हणाले की, `अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर 96 वर्षांपर्यंत जगणं थोडं कठीण आहे. कारण मी अजून चाळिशीही पार केलेली नाही. त्यामुळे हे अनुमान माझ्या अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे. इतकंच नाही तर कॅल्क्युलेटरनं सांगितलं, की साखर आणि गोड पदार्थ खाणं वर्ज्य केलं तर मी वयाची शंभरीही गाठू शकतो. ही खूपच आश्चर्यकारक बाब आहे. चुकूनही खाल तर तुमच्या जीवाला धोका; बंदी असूनही विकला जातोय हा खतरनाक मासा मी लगेच माझ्या सर्व कुटुंबीयांना या टूलची लिंक मेसेज केली. त्यांनीदेखील यावर आपलं आयुर्मान जाणून घेतलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याचे निकाल अनपेक्षित होते, असं त्यांनी सांगितलं.