पिंपळ - पिंपळाच्या झाडाला तसं धार्मिक महत्वही आहे. पण, जास्त महत्वाचं हे आहे की, हे झाड 24 तास ऑक्सिजन देतं. पिंपळाचं झाड रात्रीदेखील ऑक्सिजनची निर्मिती करतं.
अर्जुन – अर्जुनचं झाड पर्यावरणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ओळखलं जातं. आयुर्वेदातही या झाडाला महत्व आहे. पर्यावरणातील कार्बनडाय ऑक्साईड आणि इतर दूषित वायु शोषून ऑक्सिजनमध्ये बदलतं.
अशोक – अशोकाचं झाड पिंपळ किंवा लिंबाच्या झाडाइतकं मोठं नसतं. पण, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात निर्माण करतं. ऑक्सिजनच्या निर्मितीबरोबर वातावरणातले दूषित गॅसही कमी करतं.
बांबू – बांबूच झाड तसं गवतवर्गी आहे. याची वाढ फार वेगाने होते. इतर झाडांच्या तुलनेत 30 टक्के जास्त ऑक्सिजन देतं.
वड – राष्ट्रीय वृक्ष म्हणून ओळखलं जाणाऱ्या वडाच्या झाडालाही धार्मिक महत्व आहे. वडाचं झाड 22 तास ऑक्सिजन देतं. हे झाड जेवढं जास्त मोठं असतं तेवढी ऑक्सिजन निर्मितीही जास्त होते.
तुळस – तुळशीचं रोप फार मोठं होत नाही. पण, पर्यावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मात्र पुरवतं. तुळस 2 ते 3 फूट एवढीचं वाढते मात्र, रात्री देखील ऑक्सिजन देत असल्याने तिचं महत्व वाढतं.
जांभूळ – जाभंळाचं झाड मोठं असतं, हे झाड जवळजवळ 50 ते 80 फूटही वाढू शकतं. हे सल्फरडाय ऑक्साईड आणि नायट्रोजनसारख्या विषारी वायुंना संपवून ऑक्सिजनची निर्मिती करतं.
कडूलिंब – कडूलिंबात भरपूर औषधी गुणधर्म असतात. हे झाड देखील जवळजवळ 22 तास ऑक्सिजनची निर्मिती करतं. कडूलिंबामुळे त्याच्या आसपासच्या हवेतील बॅक्टेरीयाही संपतो.