• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • मेडिटेशन करायला आवडतं, पण झोप येते म्हणून टाळता? टेन्शन नको; करा ‘हे’ उपाय

मेडिटेशन करायला आवडतं, पण झोप येते म्हणून टाळता? टेन्शन नको; करा ‘हे’ उपाय

मेडिटेशन शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी लाभदायक आहे

मेडिटेशन शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी लाभदायक आहे

मेडिटेशन करण्यामुळे झोप येण्याची बरीच कारणं आहेत. काही सवयींवर नियंत्रण ठेवलं तर ही समस्या संपू शकते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : मनावरचा तणाव (Stress Level) कमी करण्यासाठी मेडिटेशन (Mediation) हा उत्तम उपाय आहे. मेडिटेशन केल्यामुळे मन शांत होतं याशिवाय मेडिटेशनमुळे झोपची समस्या (Sleeping problems)कमी होते. बऱ्याच लोकांना मेडिटेशन केल्यानंतर चांगली झोप लागते. सकाळी मेडिटेशन करणाऱ्या लोकांना बऱ्याचदा मेडिटेशननंतर झोप येत असेली तरी, झोपणं शक्य नसतं. अशावेळेस मेडिटेशन करून तणाव कमी करण्याबरोबरच स्वत:च्या झोपेवर कसं नियंत्रण(Control On sleep) ठेवायचं हे जाणून घेऊयात. मेडिटेशन आणि झोप मेडिटेशन शरीर शांत (Body Relax) करण्याबरोबरच आपल्याला चांगली झोप येण्यासाठी उपयोगी आहे. 2020 साली 6 अठवड्यांकरता काही लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार 11 मिनिटं योग निद्रा मेडिटेशन केल्यामुळे 341 लोकांना स्ट्रेस कमी होऊन उत्साही वाटायला लागलं आणि चांगली झोप येण्यास सुरुवात झाली. तर याच अभ्यासामधील 430 लोकांना कोणताही परिणाम जाणवला नाही. (Bride Video: ना कपड्यांची चिंता ना मेकअपची;लिफ्टमध्ये जमिनीवर बसून नवरीची पार्टी) मेडिटेशन करताना झोप का येते मेडिटेशन आणि झोप यांच्यामध्ये ब्रेन व्हेन अॅक्टिविटी काम करत असते. दिवसभर थकवा आणि कमी झोप घेणं. जेवणानंतर मेडिटेशन करणं. अंथरूणात पडल्यावर किंवा बेडरूममध्ये मेडिटेशन करणं. आजारपण किंवा स्ट्रेस कमी झाल्यामुळे झोप येते. (झोपेत होईल वजन कमी! आधी रात्री होणाऱ्या चुका टाळायला तर शिका) मेडिटेशन करताना झोप न येण्यासाठी उपाय मेडिटेशन करण्याआधी जेवण करून नये. बेडरूममध्ये मेडिटेशन करू नये. मेडिटेशन करण्यासाठी शांत जागा निवडावी. घराबाहेर गार्डनमध्ये मेडिटेशन करावं, म्हणजे पक्षांच्या चिवचिवाटामुळे झोप येणार नाही. मेडिटेशन करताना वॉक करू शकता किंवा शक्य असेल तर, एका जागेवर उभा राहा. दररोज पूर्ण झोप घ्यावी त्यामुळे बॉडी रिलॅक्स होईल. बेंचवर बसून मेडिटेशन करू शकता. (आता फक्त मासोळ्या पाळण्याचा व्यवसाय करा आणि महिन्याला कमवा तब्बल 2 लाख रुपये) डोळे उघडे ठेवूनही मेंटेशन करता येतं. उत्साह वाटत असताना मेडिटेशन करावं. दिवसभर भरपूर पाणी प्यावं. एखादं गाणं ऐकत मेडिटेशन करावं. मेडिटेशन छोट्या छोट्या सेशनमध्ये करावं.
  Published by:News18 Desk
  First published: