मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

संध्याकाळच्या चहाआधी हे वाचा! ‘या’ इंचभर पदार्थाने होतं वजन कमी, कसा वापरायचा पाहा

संध्याकाळच्या चहाआधी हे वाचा! ‘या’ इंचभर पदार्थाने होतं वजन कमी, कसा वापरायचा पाहा

आलं गुणधर्माने गरम आहे म्हणून उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वापर केल्याने त्रास होऊ शकतो.

आलं गुणधर्माने गरम आहे म्हणून उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वापर केल्याने त्रास होऊ शकतो.

आल्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आलं वापरण्याच्या (Use of Ginger) विविध पद्धती आहेत.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 01 जुलै: जेवण आणि चहाची चव वाढवणारं आलं आयुर्वेदिक औषधांमध्येही (Ayurvedic Medicine) वापरलं जातं. आपली रोग प्रतिकारक शक्ती (Immunity Booster) वाढवण्यासाठी आलं फायदेशीर आहे. सर्दी-खोकल्याच्या त्रासात आल्याचा वापर होतो. कोरोना (Corona) काळात तर, आलं वापरून काही काढे (Decoctions) पिण्याचे फायदे असल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यसाठी वापरलं जाऊ लागलं. आल्याचा 1छोटा तुकडा (Ginger) देखील आपलं वजनही कमी (Weight Loss) करू शकतो. मासिक पाळीदरम्यान (Period) महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.  या दिवसांमध्ये आल्याचा चहा पिणं उपयुक्त ठरतंय. आल्यामुळे तणाव  (Stress) दूर होण्यास मदत होते. कारण आल्याचा सुगंध आणि इतर औषधी गुणधर्मांमुळे मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यात उपयोग होतो. आल्यामध्ये ऍन्टीऑक्सिडेंट्स (Antioxidants) भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे पचन सुधारण्यासाठी कार्य करतं.

आल्यात सुज कमी करण्याचे गुणधर्म आहेत. तर, शरीरातील चरबी वितळवण्यातही फायदा होतो.

वजन कमी करण्यासाठी आल्याचा वापर करण्याआधी त्याच्या अतिवापरामुळे होणारे परिणामांची माहिती आधी घेउयात.

(शरीरावर प्रयोग करू नका! कोरोना ऐवजी काढा पिण्यानेच जावं लागेल रुग्णालयात)

आलं गुणधर्माने गरम आहे म्हणून उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वापर केल्याने त्रास होऊ शकतो. पाईल्सचा त्रास असल्यास वाढू शकतो. आल खाण्याने महिलांना पीरियडमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. याशिवाय गॅस,ऍसिडिटी, जळजळ अशाही समस्या होऊ शकतात. म्हणून वजन कमी करण्यासाठी आल्याचा एक छोटा तुकडाच वापरावा.

जाणून घेऊयात वजन कमी करण्यासाठी आल्याचा वापर

1.आलं दररोज पाण्यात उकळवून त्यात अर्धा लिंबू पिळून चहासारखे घतले तर वजन कमी होण्यास मदत होते. तसेच, शरीराचं मेटाबॉलिजम सुधारतं. वजन कमी करण्यसाठी दिवसातून कमीतकमी दोनदा प्याव.

('हे घरचे डॉक्टर वाट चुकवतील'; अनावश्यक तपासण्या, माहितीबद्दल डॉक्टरच करतायत सावध)

2.ऍपल सायडर व्हिनेगर आणि आल्याचं पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यात मदत होते. यासाठी आल्याचे छोटे छोटे तुकडे करा. ते पाण्यात थोडे उकळू द्या पाणी गाळा आणि कोमट झाल्यावर त्यात ऍपल सायडर व्हिनेगर घालून प्या. पण,खुप गरम पाण्यात ऍपल सायडर व्हिनेगर घालू नका.

3.वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी घेचत असाल तर, त्यात आलंही घाला. वजन कमी लवकर कमी करण्याबरोबर आणखीनही बरेच फायदे होतील.

(शरीरात वाढलं युरिक ऍसिड? चिंता सोडा; रोज कच्चा खा ‘हा’ पदार्थ)

4.आल्याचा रस मध आणि थोडासा लिंबाचा रस घेतल्यानेही खूप चांगले फायदे होतात. फक्त आलं आणि मध एकत्र करूनही घेता येतं.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Period, Weight loss, Wellness