आपली बदलेली दैनंदिन जीवनशैली खाण्यापिण्याच्या सवयी अनेक आरोग्य समस्यांना आमंत्रण देत असतात. अशीच एक समस्या म्हणजे युरिक ऍसिड वाढण्याचा त्रास.
पचनक्रिया(Digestion)सुरू असताना प्युरीन नावाच्या प्रोटीनचं कमी होत असेल तर, रक्तात युरिक ऍसिड तयार व्हायला लागतं. ऍसिड वाढल्यास ते मुत्राद्वारे शरीराच्या बाहेर फेकलं जातं.
युरिक ऍसिड जास्त वाढलं तर, किडनीवरही दबाव वाढायला लागतो. त्यामुळे किडनी फिल्टरेशन क्रियाही अनियंत्रीत होते. अशा परिस्थितीत डॉक्टारांचा सल्ला घ्यायला हवा.
कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तातलं युरिक ऍसिडच कमी होत नाही तर, शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यासाठी कच्च्या कांद्याचं सॅलड बनवू शकता किंवा रिकाम्या पोटी किंवा जेवणाबरोबर खाऊ शकता.
युरिक ऍसिड नियंत्रणात येण्यासाठी मेटाबॉलिजम(Metabolism) चांगलं असणं आवश्यक असतं. कच्चा कांदा मेटाबॉलिजम बुस्ट करण्याचं काम करतं.
कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे शारीरातले घातक द्रव्य बाहेर फेकले जातात. कांदा खाण्याने वजनही नियंत्रणात येतं.
कांदा शरीरातील प्युरीन प्रोटीन कमी करुन, नॉर्मल प्रोटीन वाढवतो. कांद्यात फॉलेट ऍसिड, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमीन ए,सी आणि ई असतं. शिवाय सोडिअम, पोटॅशियम भरपुर असतं.
यात ऍन्टी-ऑक्सिडंट, ऍन्टी-इम्फ्लामेट्री, ऍन्टी-कार्सेनोजेनिक घटक असताना त्याने ऍसिडीटी कंट्रोलमध्ये येतं. युरिक ऍसिड वाढल्याने शरीराला येणारी सुज आणि वेदना कमी होतात.