Home /News /heatlh /

शरीरावर प्रयोग करू नका! कोरोना ऐवजी काढा पिण्यानेच जावं लागेल रुग्णालयात

शरीरावर प्रयोग करू नका! कोरोना ऐवजी काढा पिण्यानेच जावं लागेल रुग्णालयात

काहीजण कोरोना होऊ नये म्हणून घरच्याघरीच काही काढे बवून पित आहेत.

काहीजण कोरोना होऊ नये म्हणून घरच्याघरीच काही काढे बवून पित आहेत.

कोरोना (Corona) काळात इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी बरेच लोक काढा प्यायला लागले आहेत पण, याचे साईड अफेक्ट (Side Effect) माहिती आहेत का ?

    नवी दिल्ली, 30 जून : कोरोनाची दुसरी लाट (Second  Wave of Corona) ओसरत असताना डेल्टा प्लस व्हायरसची (Delta Plus Virus) भीती सगळीकडे पसरलेली आहे. लहान मुलांसाठी कोरोनाचा तिसरी लाट धोकादायक असल्याने पालक इम्युनिटी वाढवण्यासाठी आहाराकडे (Immunity Boosting Diet) जास्त लक्ष देत आहेत. तर, काहीजण कोरोना होऊ नये म्हणून घरच्याघरीच काही काढे (Decoction) बवून पित आहेत. काढा पिण्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते असा एक समज पसरलेला आहे.पण, कोरोनाच्या भीतीने काढा घेणाऱ्या बऱ्याच जणांना इतर आजार(Different Illness)व्हायला लागले आहेत. जास्त प्रमाणात काढा पिण्याने मूळव्याध (Hemorrhoids) आणि गुदद्वारासंबंधीचा त्रास व्हायला लागले आहेत. काढे अति प्रमाणात पिण्याने बरेच दुष्परिणाम  (Side Effect of Decoction) होतात असं डॉक्टर सांगतात. (अन्ननलिका जाळून काढली; रिमोटची बॅटरी गिळताच तासाभराने गेला चिमुकलीचा जीव) डॉक्टरांच्या मते कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय काढा पिऊ नये. डॉक्टरांकडे काढा पिण्याने त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. दिल्लीच्या मूलचंद रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका महिलेला जास्त प्रमाणात काढा पिण्याने त्रास होत होता. तिला 4 दिवसांपासून शौचाला त्रास होऊन रस्तस्त्रावही होऊ लागला होता. तिने डॉक्टरांना सांगितलं की, ती 3 महिन्यांपासून दररोज 4 ते 5 ग्लास काढा घेत होती. त्यामुळे काही आठवड्यांपासून तिला पोटादुखीचा त्रास होऊ लागला. या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. (कोरोनाचा भयंकर परिणाम! कोविड रुग्णांच्या मलमार्गातून रक्तस्राव, एकाचा मृत्यू) काढा पिण्याने होतो त्रास मूलचंद रुग्णालयाचे (Mulchand Hospital)डॉ. सचिन अंबेकर सांगतात की, गेल्या काही महिन्यांपासून दररोज 4 ते 5 रुग्ण मूळव्याध (Hemorrhoids) आणि फिशरच्या तक्रारी घेऊन येतात. यातील काहीजणांना कोरोना होऊन गेलेला असतो किवा काहींनी कोरोना होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात काढा घेतलेला असतो. याव्यतिरिक्त बर्‍याच रुग्णांनी व्हिटॅमिन-सी आणि डी देखील घेतलेले असतात. (आयुष्याची लॉटरी! लकी ड्रॉमुळे वाचला एक वर्षाच्या चिमुकलीचा जीव) डॉक्टर सचिन यांच्या मते, बरेच रूग्ण स्वत:च उपचार करण्याचा प्रयत्न करतात आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजेसवरून असे प्रयोग स्वत:वर करतात. डॉक्टर सांगतात की अतिप्रमाणात काढा पोट आणि आतड्यांना कोरडं करतो. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते आणि नंतर मूळव्याध आणि फिशरसारखे आजार होतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Side effects

    पुढील बातम्या