मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Doctor's Day : 'हे घरचे डॉक्टर नक्की वाट चुकवतील'; अनावश्यक तपासण्या आणि माहितीबद्दल डॉक्टरच करतायत सावध

Doctor's Day : 'हे घरचे डॉक्टर नक्की वाट चुकवतील'; अनावश्यक तपासण्या आणि माहितीबद्दल डॉक्टरच करतायत सावध

डॉक्टर्स दिनाच्या (Doctor's day 2021) निमित्ताने आयएमएचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी गुगल डॉक्टर्सपासून (Google doctor's) सावध केलं आहे.

डॉक्टर्स दिनाच्या (Doctor's day 2021) निमित्ताने आयएमएचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी गुगल डॉक्टर्सपासून (Google doctor's) सावध केलं आहे.

डॉक्टर्स दिनाच्या (Doctor's day 2021) निमित्ताने आयएमएचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी गुगल डॉक्टर्सपासून (Google doctor's) सावध केलं आहे.

  • Published by:  Priya Lad

डॉ. अविनाश भोंडवे/ मुंबई, 01 जुलै : भारतात संगणकांची आणि इंटरनेट वापरण्याची व्याप्ती वाढू लागल्यापासून वैद्यकीय माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्च इंजिनचा वापर मुक्त हस्ते केला जातो आहे. मोबाईलचे स्मार्टफोन्स आल्यापासून तर याचा वापर चौपटीने वाढला.

डॉक्टर (Doctor's Day) वर्गात अशा व्यक्तींना 'गुगल डॉक्टर' (Google doctor) असं उपहासाने म्हटलं जातं.

यामध्ये विशेष करून तरुण वर्गाचा समावेश जास्त आहे. पण मध्यमवयीन सुशिक्षित स्त्री-पुरुषांचा समावेशही सध्या जास्त आहे. हे गुगल डॉक्टर्स गुगलचा वापर कोणत्या गोष्टींसाठी करतात, त्यात काय घडू शकते आणि काय प्रश्न उभे राहतात ते पाहू.

1) जवळचा डॉक्टर किंवा विशिष्ट स्पेशालिस्ट शोधण्यासाठी

अनेकदा तरुण वर्ग आजारी पडल्यावर आपल्या जवळच्या फॅमिली डॉक्टरकडे प्रथम न जाता, गुगलवर त्यांच्या शारीरिक तक्रारीसाठी स्पेशालिस्ट शोधतात. यामध्ये पोट दुखल्यास पोटाचे स्पेशालिस्ट, डोके दुखल्यास मेंदूचे आणि त्वचेवर पुरळ आली तरी त्वचारोग तज्ञाकडे ते धाव घेतात. यात दोन घोटाळे होतात. एक म्हणजे सर्वच आजारांना स्पेशालिस्टची गरज नसते. प्रथम फॅमिली डॉक्टरकडे तपासून औषधं घ्यावीत आणि त्यांचं मत पडलं तरच स्पेशालिस्टना दाखवायचं असतं, या साध्या व्यवहारी तत्वाला ते गुंडाळून ठेवतात.

हे वाचा - न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे काय? दुर्लक्ष केल्याने होतील वाईट परिणाम

गुगलवरून शोधलेला डॉक्टर हा उत्तम डॉक्टर असेलच असं नाही. मेडिकल काऊन्सिलच्या वैद्यकीय नीतिमत्तेविषयक कायद्याप्रमाणे डॉक्टरांना जाहिरात करायला सक्त मनाई असते, जाहिरात केल्यास डॉक्टरांचं वैद्यकीय सेवेचं प्रमाणपत्र रद्द होऊ शकतं. त्यामुळे उत्कृष्ट डॉक्टर्स आपली जाहिरात कधीच करत नाहीत. साहजिकच असे गुगलवर सापडणारे डॉक्टर्स बहुधा नितीमत्ता न सांभाळणारे, बोगस किंवा योग्य ती पदवी आणि शिक्षण न घेतलेले असू शकतात. अशांच्या फसवणुकीच्या सापळ्यात हे तरुण सापडतात.

2) आपल्या लक्षणावरून आजाराचे निदान आणि त्याची औषधं ते गुगलवर शोधून ठरवतात आणि त्याप्रमाणे उपचार करतात.

अशा व्यक्तींचे आजार बरेही होत नाहीत कित्येकदा आजार वाढतात आणि त्यात कॉम्प्लिकेशन्स झालेली आढळतात.

याचं कारण म्हणजे गुगलवर कोणीही अप्रमाणित डॉक्टर नसलेली व्यक्ती अशा आजारांची चुकीची माहिती आणि त्यावरचे चुकीचे इलाज टाकू शकते. अशा अप्रमाणित आणि दर्जा नसलेल्या अनेक साईट्स आणि ब्लॉग्ज यांची भरमार इंटरनेटवर आहे. त्यामुळे गुगलवर आलेली माहिती ही योग्य आणि बिनचूक असते असं नाही.

वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत वेबसाईट, विख्यात मेडिकल जर्नल्स या अशाप्रकारची माहिती देत नाहीत. आणि त्यांना पैसे भरून सबस्क्राइब करावे लागतं. त्यांचा सल्ला मिळवण्यातही इमेल करावा लागतो.

हे वाचा - Fake Corona Vaccination म्हणजे काय? बनावट लसीकरण ओळखायचं तरी कसं?

शिवाय एकाच लक्षणाचे आजार अनेक असू शकतात, त्यामुळे रुग्णाला कोणता आजार असू शकेल याचा कयास डॉक्टरच करू शकतात. त्याचप्रमाणे एकाच आजाराला अनेक औषधांचे पर्याय असतात, आपल्या रुग्णाला कोणते औषध द्यायचे हे डॉक्टर त्यांच्या ज्ञानाने ठरवतात. गुगलवरून ते ठरवता येत नाही.

3) अनावश्यक तपासण्या

गुगलवर वाचून अनेक रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेण्याआधीच तपासण्या करून घेतात. त्या अनेकदा चुकीच्या असतात आणि पैशांचा अपव्यय करणाऱ्या असतात. पोटात दुखते म्हणून सोनोग्राफी करून येणारे हजारो रुग्ण मी पाहिले आहेत. त्यांना अपचन, अॅसिडिटी, अमेबियासिस अशा कारणांनी पोटात दुखत असतं. या गोष्टी सोनोग्राफीत कधीच येत नाहीत. तीच गोष्ट डोकं दुखते म्हणून परस्पर जाऊन मेंदूचा एमआरआय करणाऱ्या हुशार व्यक्तींची. त्यांचं डोकं मायग्रेन किंवा सायनुसायटिसने दुखत असते. पण त्यासाठी अकारण एमआरआय करून काही हजार रुपये घालवून येतात.

4) माहिती आणि ज्ञान

वैद्यकीय ग्रंथ, पाठ्यपुस्तकं, अनेक वर्षे प्रत्यक्ष पेशंट्स तपासून आलेला अनुभव, त्या त्या क्षेत्रातील नामवंतांशी चर्चा, त्यांची सप्रमाण व्याख्याने, नव्या संशोधनांची, तंत्रज्ञानाची, औषधांची साधक-बाधक चर्चा अशा अनेक घडामोडीतून डॉक्टरांचं ज्ञान विकसित होत असतं. इंटरनेटवर माहिती मिळते पण ज्ञानाचा वापर करून आजाराचं निदान आणि औषधोपचार करण्यासाठी योग्य त्या डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून, तपासूनच ट्रिटमेंट घ्यायची असते.

5) डॉक्टरांना चॅलेंज

आजकाल बहुसंख्य तरुण वर्ग चांगल्या अनुभवी डॉक्टरांनी दिलेली औषधं, त्यांनी केलेलं निदान यावर गुगलवर माहिती घेऊन डॉक्टरांना तुमचं चुकतं, असं सांगताना दिसतात. अशा व्यक्तींचा डॉक्टरांपेक्षा गुगलवर जास्त विश्वास असतो. त्यामुळे हे तरुण डॉक्टरांनी दिलेली औषधं सांगितल्याप्रमाणे घेत नाहीत आणि आजार वाढवून ठेवतात.

हे वाचा - 

माझ्या एका डॉक्टर मित्राने त्याच्या दवाखान्याबाहेर असलेल्या चप्पल स्टॅण्डपाशी एक बोर्ड लिहिला आहे, "आत येताना कृपया आपली पादत्राणे आणि गुगलची माहिती बाहेर ठेवून यावं."

First published:

Tags: Doctor contribution, Health, Lifestyle