मुंबई 9 जुलै: सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षापासून प्रत्येकाच्याच जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन लेक्चरमुळे बाहेर वॉकला जाण्याची, व्यायाम करण्याची सवय काहींची निघून गेली आहे. दररोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम शरीरावर किंवा मनावर होत आहे. काहीजण मानसिक व्याधींनी त्रस्त आहेत तर काहीजणांचे शारीरिक आजार वाढले आहेत. यामध्ये सर्वात मोठा आणि चिंताजनक आजार म्हणजे वजन वाढणे. कित्येकजण आज वजनवाढीच्या त्रासाने त्रस्त आहेत. कारण हा आजार केवळ तुमच्या शरीरापुरता मर्यादित नसून यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्वही बेढब बनते.
VIDEO: वर्क फ्रॉम होममध्ये किती तास आणि कसं काम करावं, ऐका डॉक्टरांचा सल्ला
लाखो प्रयत्न करूनही कित्येकांना वजन कमी करण्यात यश प्राप्त होत नाही. काहीजण स्ट्रिक्ट डाएट (Diet) फॉलो करतात तर काहीजण घरगुती उपाय (Home Remedies) करून पाहतात. आणि शेवटी काहीच परिणाम दिसला नाही तर जिम गाठतात. जिममध्ये हजारो रुपये घालवून बारीक होण्याचा प्रयत्न करतात. पण काहीवेळेस हे प्रयत्नही फोल ठरतात.
केसांसाठी सगळे उपाय करून झाले? ‘या’ Home Remedies करूनच पाहा; केस वाढतील तिपटीने
पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की नक्की वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट काय असलं पाहिजे? तर याच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. अशा 6 टिप्स आहेत ज्या फॉलो केल्याने तुम्ही आठवड्यात वजन कमी करू शकाल.
१. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शरीरातील फॅट्स बर्न करायचे असतील तर कमी प्रोटीन असलेला आहार घेणं गरजेचे आहे.
२. दुसरी गोष्ट म्हणजे, तळलेले, चमचमीत, मसालेदार पदार्थ खाण्याऐवजी ग्रील्ड केलेले पदार्थ खावेत. भाजलेल्या पदार्थांमुळे शरीरात फॅट्स तयार होत नाहीत.
३. अल्कोहोल, कोल्डड्रिंक्स आणि मिठाई यांसारख्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. कारण फॅट्स वाढवण्यामध्ये यांचा सक्रिय वाटा असतो. आणि त्यापासून निर्माण झालेले फॅट्स बर्न करण्यासाठी खूप कालावधी लागतो.
४. एखादा पदार्थ खाण्यापूर्वी त्यामध्ये असलेल्या कॅलरीजची माहिती घ्यावी आणि आपण दिवसभरात जितक्या कॅलरीज बर्न करू शकता तेवढ्याच कॅलरीज आपल्या शरीरात गेल्या पाहिजे, याची काळजी घ्यावी.
५. ब्रेकफास्टमध्ये बदाम खायला सुरूवात करावी. कारण यामध्ये प्रोटीनही असते जे शरीरातील स्नायूंसाठी उपयुक्त असतात. त्यातील फायबरमुळे रात्रीची तुम्हाला भूकही लागत नाही. यामुळे वजन घटवण्यासाठी बदामास सुपरफूड मानले जाते.
६. आणि शेवटची अत्यंत महत्त्वाची टिप म्हणजे आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. कारण यामध्ये कार्बोहायट्रेट्स आणि कॅलरीज खूपच कमी असतात. फायबरही भरपूर प्रमाणात असते. तुम्ही जर अशा भाजांचे सेवन केले तर तुमचे वजनही जास्त प्रमाणात वाढणार नाही आणि पोटही पूर्णपणे भरेल.
तर या सर्व टिप्सचे अनुसरण केले तर नक्कीच तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Weight loss