शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी आहे उपयुक्त हे जादुई फूल
कमळ काकडीविषयी ऐकलंय का? कमळाचं फूल, त्याच्या बिया आणि मुळं औषधी गुणधर्माने युक्त असतात.
|
1/ 8
कमळ काकडी म्हणजे कमळाच्या मुळांमध्ये व्हिटॅमीन सी, पोटॅशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट, स्टार्च, फायबर ऍन्टिऑक्सिडंट आणि ऍन्टिइम्लामेट्री गुण असतात. त्यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर होतात.
2/ 8
कमळ काकडी चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग किंवा मुरूमांची समस्या असेल तर, कमळ काकडीचा आहारामध्ये समावेश करावा. कमल काकडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं.
3/ 8
आजकाल बऱ्याच तणावाची समस्या वाढू लागलेली आहे. कमळ काकडी तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये पायोरोडॉक्सिन असतं. जे तणाव कमी करण्यात मदत करतं.
4/ 8
कामळ काकडी रक्तातील साखर नियंत्रित करण्याबरोबर कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यात उपयोगी आहे. यामध्ये डायटरी फायबर असतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतं.
5/ 8
शरीरावर सूज आली असेल तर, कमळ काकडी खावी. कमळ काकडीमध्ये मेथेनॉल अर्क असतो. जो परिणामकारक ऍन्टीइम्फामेट्री एजंट आहे. ज्यामुळे शरीरावरची सुज कमी व्हायला मदत होते.
6/ 8
लूज मोशनचा त्रास असणाऱ्यांसाठी कमळ काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. कमल काकडीमध्ये ऍन्टीडायरिया गुण असतात. त्यामुळे डायरिया सारख्या त्रासांमध्ये फायदा होतो.
7/ 8
डायबेटिस रुग्णांसाठी कमळ काकडी खूपच उपयोगी ठरते. कमळ काकडीतील इथेनॉल अर्क शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढून रक्तामधलं साखरेचं प्रमाण कमी व्हायला मदत होते.
8/ 8
शरीरात आयर्नची पातळी कमी झालेली असेल तर, त्यामुळे योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन तयार होत नाही. अशा लोकांनी कमळ काकडी खायला हवी. यामुळे शरीरातील मधली रक्ताची कमतरता दूर होते.