Home /News /lifestyle /

घरात लावा ही रोपं! आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा

घरात लावा ही रोपं! आजारपण,स्ट्रेस जाईल पळून; वाढेल सकारात्मक उर्जा

ऑक्सिजन घरामध्येच उपलब्ध करून देणारे काही इनडोअर प्लॅन्ट आहेत

ऑक्सिजन घरामध्येच उपलब्ध करून देणारे काही इनडोअर प्लॅन्ट आहेत

Corona : मनात सकारात्माक विचार (Positive Thinking) येतील असं वातावरण घरातही असायला हवं. घारात लावलेल्या रोपांमुळेही समारात्मक उर्जा मिळते.

    नवी दिल्ली, 27 जुलै : कोरोनाचं (Corona) वाढतं प्रमाण पाहता लोकांच्या मानावरचा ताण (Stress) वाढायला लागला आहे. कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) आता सुरू होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन (Lockdown) आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरनाच्या भीतीने लोक ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) करत आहेत त्यामुळे सतत घरातच राहिल्यामुळे बऱ्याच लोकांना स्ट्रेस जाणवत आहे. वातावरण,सतत येणाऱ्या नेगेटिव्ह बातम्या (Negative News) यामुळे लोकांचा संयम कमी झाला आहे. त्यामुळे निराशेमुळे काही घरात भांडणंही सुरू झाली आहेत.मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी आणि घरात शांतता राखण्यासाठी स्वत:ला काही कामात व्यस्त ठेवणं फार महत्वाचं आहे. ज्यामुळे मन डायव्हर्ट होईल आणि सकारात्मक विचार(Positive Thinking) वाढायला लागतील. याकरता स्वत:ला कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांपासून (Negative Thinking) दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घराचं वातावरण देखील अशा प्रकारे केले पाहिजे की विचार सकारात्मक राहतील आणि उत्साह वाटेल. काही झाडंही सकारात्मक उर्जेचे (Plant For Positive Energy)सर्वात महत्त्वाचे स्त्रोत ठरू शकतात. काही औषधी वनस्पती घरात ठेवल्याने पॉजिटिव एनर्जी मिळते. (पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल) तुळस तुळशीचं रोप फार मोठं होत नाही. पण, पर्यावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मात्र पुरवतं. तुळस 2 ते 3 फूट एवढीचं वाढते मात्र, रात्री देखील ऑक्सिजन देत असल्याने तिचं महत्व वाढतं. घरात तुळस लागवल्याने सुख शांती कायम राहते. ही वनस्पती देखील सकारात्मक उर्जेचा चांगला स्रोत आहे. तणाव देखील दूर करते. (चेहऱ्यासाठी वापरा coconut milk face pack; त्वचा होईल Glowing) गुलाब बाजारात अनेक प्रकारचे गुलाब मिळतात पण, घरात लावण्यासाठी गावठी गुलाब आणावा. या गुलाबाचा सुगंध सुंदर असतो. गुलाबाची फूलं शांती,प्रेम आणि सकारात्मक वातावरणाचं प्रतीक आहे. ही फूलं आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात आणि  तणाव दूर करतात. मनी प्लॅन्टमनी प्लॅन्ट ही एक हे असं वेल आहे जो कोठेही जगतो. आपण घरात बेड रूम, बाल्कनी, बाथरूम, ड्रॉईंग रूम किंवा बागेत कुठेही ठेवू शकतो. काही लोक आपल्या किचनमध्येही ठेवतात. यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी मिळते शिवाय या वेलाची जास्त काळजीही घ्यावी लागत नाही. (डिलीव्हरीसाठी तयार ठेवा Maternity Bag; हॉस्पिटलमध्ये जाताना अशी करावी तयारी) चनेली चमेलीच्या फुलाचा सुगंध सर्वांना आवडतो. जगात बर्‍याच देशांमध्ये चमेलीला अतिशय पवित्र आणि पूजनीय मानली जातं. चमेलीची फुले आत्मविश्वास वाढवतात,आपसात प्रेम आणि मैत्री वाढवतात, नाती मजबूत करतात. याशिवाय अनेक प्रकारचे तेल आणि बॉडी वॉश, साबणही,धूप आणि मेणबतीतत याचा हा सुगंध वापरला जातो. हे रोप घरात असल्याने चांगली स्वप्नं पडतात असा लोकांना विश्वास आहे. रोजमेरी घरात रोजमेरी लावल्याने शुद्धतेची भावना मनात येते. यामुळे राग कमी होतो, स्ट्रेस कमी होतो किंवा एकटेपणाची भावना मनात येत  नाही असं म्हटलं जातं. रोझमेरीच्या सुवासाने मनशांती मिळते. आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ रोजमेरी लावावी किंवा घरात ठेवावी. याचा वापर जेवणातही होतो. (कोणत्या वयात आणि कसा होतो संधीवात? पुरूषांपेक्षा महिलांना असतो जास्त त्रास) लिली लिलीला देखील पवित्र मानलं जातं. हे फूल आनंदाचे प्रतीक मानलं जाते. घरात आनंद नांदतो आणि सर्व नकारात्मका निघून जाते. घराच्या बेडरूममध्ये लिली लावल्याने रात्री चांगली झोप येते. सकाळही उत्साहात होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Home-decor, Lifestyle, Stress

    पुढील बातम्या