Home /News /lifestyle /

दहावीत केवळ 44% मिळवणारे अविनाश शरण; मेहनतीने झाले IAS ऑफिसर

दहावीत केवळ 44% मिळवणारे अविनाश शरण; मेहनतीने झाले IAS ऑफिसर

अविनाश शरण यांना त्यांच्या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शाबासकी मिळालेली आहे.

अविनाश शरण यांना त्यांच्या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शाबासकी मिळालेली आहे.

Inspiration Story: IAS ऑफिसर अविनाश शरण यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांनीदेखील कौतुक केलेला आहे.

    नवी दिल्ली, 27 जुलै :  2017 मध्ये बलरामपूर मध्ये कलेक्टर असताना अविनाश शरण यांनी आपली मुलगी वेदिका हिला एका सरकारी प्राथमिक शाळेत अ‍ॅडमिशन घेतल्याने चर्चा झाली होती. त्यावेळेस देशभरात त्यांचं कौतुक करण्यात आलं. आयएएस ऑफिसर अविनाश शरण (IAS officer Awanish Sharan) यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांनीदेखील कौतुक केलेला आहे. अतिशय सरळ साध्या स्वभावाचे, आपल्या कर्तव्यप्रती जागरूक असणारे अविनाश शरण यांना त्यांच्या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शाबासकी मिळालेली आहे. अविनाश शरण हे छत्तीसगडच्या UPSC बॅचचे आयएएस अधिकारी (IAS Officer) आहेत. ते सोशल मीडियावरील (Social Media) एका पोस्टमुळे खूप चर्चेमध्ये आलेले होते अविनाश शरण यांना दहावी मध्ये केवळ 44 % मार्क होते असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता. (वासामुळे तोंड फिरवू नका; आरोग्यसाठी फायदेशीर आहे शेपू; वजनही होईल कमी) 2009च्या बॅचचे अधिकारी अविनाश शरण यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये (UPSC Exam) 77वा रँक मिळवला होता. यांना दहावीमध्ये 44 %, 12 वीमध्ये 65 % आणि ग्रॅज्युएशनमध्ये 60 % मार्क होते. अविनाश शरण सोशल मीडियावर अत्यंत अ‍ॅक्टिव्ह आहेत. ट्विटरवर (Twitter) ते कायम आपली प्रतिक्रिया देत असतात. त्यांच्या टक्केवारीवरुन सुरू असलेल्या चर्चेवर स्वतः अविनाश शरण यांनी उत्तर दिले आहे. (Workout नंतर तुम्हालाही अशक्तपणा जाणवतो? या पदार्थांचं सेवन करा आणि थकवा दूर करा) ते म्हणतात, माझ्या अभ्यासातल्या कामगिरीबद्दल एक पोस्ट व्हायरल होत आहे. अनेक जणांनी उत्तर देण्याची विनंतीही केली होती. मला खरंच एवढे मार्क होते. पण, याचा अर्थ असा नाही की अभ्यास न करताही पास होता येतं. (ना कोचिंग क्लास, ना मार्गदर्शन; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉपर 22व्या वर्षी IAS) त्यांनी अभ्यासामध्ये कमी मार्क असल्याचं ट्विटरवर कबूल करत विद्यार्थ्यांना मात्र अभ्यास करण्याचा सल्ला. माझं उदाहरण म्हणजे अभ्यास न करण्याचा कोणताही बहाणा असू शकत नाही असं त्यांनी ट्विटरवरून पोस्ट करत सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ias officer, Inspiring story, Success story, Upsc exam

    पुढील बातम्या