मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नाही लागणार औषधाची गरज; या 5 गोष्टी घरच्या घरी Stress करतील दूर

नाही लागणार औषधाची गरज; या 5 गोष्टी घरच्या घरी Stress करतील दूर

ज्या कारणांमुळे भावना अनावर होतात त्याला ट्रिगर्स म्हटलं जातं. आपल्याला कोणत्या गोष्टीची आठवण आल्यामुळे किंवा एखाद्या व्यक्ती मुळे, परिस्थितीमध्ये त्रास होतोय हे ओळखून वागायला हवं. म्हणजेच हा ट्रिगर ओळखला तर उपायही करता येऊ शकतात.

ज्या कारणांमुळे भावना अनावर होतात त्याला ट्रिगर्स म्हटलं जातं. आपल्याला कोणत्या गोष्टीची आठवण आल्यामुळे किंवा एखाद्या व्यक्ती मुळे, परिस्थितीमध्ये त्रास होतोय हे ओळखून वागायला हवं. म्हणजेच हा ट्रिगर ओळखला तर उपायही करता येऊ शकतात.

Tips to Reduce Mental Stress: मानसिक ताणावामुळे (Mental stress) आरोग्यावर आणि सौंदर्यावर परिणाम होतो. म्हणूनच, तणावाचा त्रास शुल्लक वाटला तरी, दूर करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. घरच्या घरी करून पाहा 5 उपाय

  • Published by:  News18 Desk
दिल्ली ,31 मे : या कोरोनाकाळात (Corona Pandemic) सगळीकडेच नकारात्मकता (Negativity) पसरली आहे. ज्यामुळे मानसिक ताण (Mental stress) वाढलेला आहे. मानसिक ताण आपल्या आरोग्याबरोबर(Health) सौंदर्याचही(Beauty)नुकसान करतो. आरोग्य आणि सौंदर्याचं कोणतंही नुकसान होऊ नये,यासाठी तणाव दूर करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण, त्यासाठी औषधांऐवजी काही इतर गोष्टीही फायदेशीर ठरू शकतात. या उपायांमुळे कोणतेही दुष्परिणाम न होता आपल्याला बरं वाटू शकतं. जाणून घेऊयात याबद्दलची माहिती. सुगंध दूर करेल स्ट्रेस तणाव कमी करण्यासाठी सुगंधाचा वापर करू शकता. त्यामुळे आपल्या मनावरचा तणाव दूर होईल. सुगंधाचा वापर करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. यासाठी आंघोळ करण्यापूर्वी बाथ टब किंवा बादलीतील पाण्यात लॅव्हेंडर,गुलाब,चमेली या सुवासिक फुलांच्या पाकळ्या टाका. किंवा आवडीनुसार लॅव्हेंडर,गुलाब,चमेली,मोगरा तेलाचे काही थेंब टाकू शकता. अशा सुगंधी पाण्याने आंघोळ केल्यावर तुम्हाला आराम वाटेल. (अजय देवगणनं लॉकडाउनमध्ये मुंबईत घेतलं कोट्यवधींचं घर; किंमत ऐकून चक्रावून जाल) गाणी ऐका ताणतणाव कमी करण्यासाठी कोणतंही औषध घेण्यापेक्षा छोटासा उपाय करुन पहा. तणावमुक्त राहण्यासाठी चांगलं संगीत ऐका. आपल्या आवडीनुसार नवीन किंवा जुनी गाणी ऐका. गाणी ऐकण्यामुळे तुमच्या मनातील निगेटीव्ह विचार निघून जातील. हर्बल ऑईलचा वापर तणाव दूर करण्यासाठी तेलाने स्कॅल्पची मॉलिश केल्यास खूप फायदा मिळतो. यासाठी दररोज कोणत्याही हर्बल तेलाने हलक्या हातांनी आपल्या टाळूची मॉलिश करा. कधीकधी दुसऱ्यांकडून डोक्याला मॉलिश करून घ्या. त्यानेही आराम मिळेल. मॉलिश करण्यासाठी ब्राह्मी किंवा भृंगराज तेल वापरू शकता किंवा बदाम,ऑलिव्ह आणि नारळ तेल देखील वापरू शकता. यामुळे तणाव कमी होईल आणि झोपही शांत लागेल. ( टारझनचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू; Joe Lara सोबत पत्नीचाही भीषण अपघातात अंत) बॉडी मसाज तणावमुक्तीसाठी बॉडी मसाज हा देखील चांगला पर्याय आहे. बॉडी मसाजसाठी बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. आवडत असेल तर, सुगंधी तेलाचे काही थेंब टाकू शकता. मॉलिशने मानसिक तणाव दूर होण्यात मदत होईल, शरीराचा थकवा जाईल आणि मूडही चांगला होऊन झोपही चांगली लागेल.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Mental health, Stress

पुढील बातम्या