मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

टारझनचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू; Joe Lara सोबत पत्नीचाही भीषण अपघातात अंत

टारझनचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू; Joe Lara सोबत पत्नीचाही भीषण अपघातात अंत

सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विमानाचा पार चक्काचूर झाला आहे. मात्र कोणाचेही मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.

सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विमानाचा पार चक्काचूर झाला आहे. मात्र कोणाचेही मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.

सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विमानाचा पार चक्काचूर झाला आहे. मात्र कोणाचेही मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 31 मे: टारझन (Tarzan) या टीव्ही मालिकेतून नावारुपास आलेले प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते जो लारा (Joe Lara) याचं विमान अपघातात निधन झालं आहे. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्यासोबत पत्नी आणि कुटुंबातील अन्य पाच सदस्यांचंही निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जो आपल्या कुटुंबीयांसोबत एका प्रायव्हेट विमानानं प्रवास करत होते. दरम्यान विमानात काही तांत्रिक बिघाड झाला अन् नॅशविलेमधील टेनेसी नदीत त्याचं विमान कोसळलं. (Joe Lara Dead In Plane Crash) सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विमानाचा पार चक्काचूर झाला आहे. मात्र कोणाचेही मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. अजय देवगणनं लॉकडाउनमध्ये मुंबईत घेतलं कोट्यवधींचं घर; किंमत ऐकून चक्रावून जाल अमेरिकी वृत्तमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार टेनेसी नदीत सध्या रेस्यु ऑपरेशन सुरु आहे. शनिवारी नदीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना एका जोरदार धमाक्याचा आवाज झाला. सुरुवातीला हा बॉम्ब स्फोट आहे असं वाटून लोक घाबरले. त्यापैकी काहींनी पोलिसांनी फोन केले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर खरा प्रकार सर्वांच्या लक्षात आला. त्यानंतर रेस्क्यु करणाऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत विमानाचे अवशेष गोळा करण्यात आले. यावर विमान कंपनीचं नाव आणि क्रमांक होता. त्यावरुन यामध्ये कोण प्रवास करत होतं याची ओळख पटली. सध्या संपूर्ण नदीमध्ये मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. परंतु अद्याप कोणाचाही मृतदेह सापडलेला नाही. हा अपघात झाला कसा याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. ‘कोणी काम देता का काम’; दंगल फेम फातिमा कोरोनामुळं झाली बेरोजगार जो लारा हे हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेते होते. 1989 साली टारझन या मालिकेतून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांची पहिलीच मालिका तुफान गाजली. आजही प्रेक्षक त्यांना टारझन याच नावानं ओळखतात. टारझनच्या यशानंतर त्यांना चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. नाईट वॉर्स, सनसेट हीट, फायनल काउंटडाऊन, आर्मस्ट्रॉन्ग, डेड मॅन रन यांसारख्या सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास दोन दशकं त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. गेली काही वर्ष ते सिनेसृष्टीपासून दूर होते. एका नव्या प्रोजेक्टची तयारी करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. परंतु हा प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर येण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
First published:

Tags: Entertainment, Hollywood

पुढील बातम्या