Home /News /entertainment /

अजय देवगणनं लॉकडाउनमध्ये मुंबईत घेतलं कोट्यवधींचं घर; किंमत ऐकून चक्रावून जाल

अजय देवगणनं लॉकडाउनमध्ये मुंबईत घेतलं कोट्यवधींचं घर; किंमत ऐकून चक्रावून जाल

अमिताभ बच्चन यांच्या नंतर अजय देवगणनं केली कोट्यवधींची खरेदी; मुंबईत खरेदी केला आणखी एक बंगला

    मुंबई 31 मे: कोरोनामुळं सध्या देशभरातील लोक त्रस्त आहेत. (corona pandemic) लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. कंपन्या बंद पडल्यामुळं लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. पण दुसरीकडे काही बॉलिवूड सेलिब्रिटी मात्र कोट्यवधींची खरेदी करताना दिसत आहेत. अलिकडेच आलिया भट्ट (Alia Bhatt), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कोट्यवधींची घरं मुंबईत खरेदी केली. या यादीत आता अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) याचं देखील नाव जोडलं गेलं आहे. त्यानं मुंबईतील जुहू भागात तब्बल 60 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार हा बंगला 5 हजार 590 चौरस फुटांमध्ये विस्तारलेला आहे. शिवाय पार्किंग आणि गार्डनसाठी विशेष जागा आहे. आतमध्ये एक लहानसं स्विमिंग पूल देखील आहे. अजय गेल्या अनेक वर्षांपासून एका नव्या घराच्या शोधात होता परंतु त्याला हवं तसं घर सापडत नव्हतं. अखेर एके दिवशी एका मित्राच्या सल्ल्यामुळं त्यानं हा बंगला पाहिला. अन् पाहताच क्षणी तो याच्या मोहात पडला. खरं तर ही डील गेल्या वर्षीच झाली होती परंतु खरा खुरा ताबा मिळायला वर्ष लागलं. या बंगल्यासाठी अजयनं तब्बल 60 कोटी रुपये मोजले आहेत. सनी लियोनीचे शेजारी होताच बिग बींना होतोय त्रास; ब्लॉगद्वारे व्यक्त केला संताप अजयच्या प्रवक्त्यानं टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार या बंगल्याची मुळ किंमस 65 ते 75 कोटी रुपये इतकी होती. परंतु कोरोनामुळं रिअल इस्टेटचं मार्केट खालावलं आहे. त्यात तेजी नाही त्यामुळं अजयनं थोडी घाई करुन हा बंगला खरेदी केला. सध्या या घरात फर्निचर आणि इतरत्र काम सुरु आहे. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार घरामध्ये काही चेंजेस केले जाणार आहेत. शिवाय गार्डनमध्ये देखील अनेक नवी झाडं लावण्याचं काम सुरु आहे. येत्या काही महिन्यात अजय या घरात राहायला येणार आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood actor, Entertainment

    पुढील बातम्या