जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips : त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर, तर आरोग्यासाठी वरदान आहे हे टेस्टी फळ

Health Tips : त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर, तर आरोग्यासाठी वरदान आहे हे टेस्टी फळ

Health Tips : त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर, तर आरोग्यासाठी वरदान आहे हे टेस्टी फळ

हे फळ खाणारे अनेक लोक आहेत. मात्र चवीपलीकडे याचे फायदे कदाचित सर्वांना माहित नसतील. हे फळ अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 डिसेंबर : स्टार फ्रुट, काही लोकांना हे फळ माहित नसेल. पण ज्या लोकांना माहित आहे आणि त्यांनी हे फळ एकदा तरी खाल्लय त्यांच्या तोंडाला हे नाव ऐकून नक्कीच पाणी सुटलं असेल. हे फळ खाणारे अनेक लोक आहेत. मात्र चवीपलीकडे याचे फायदे कदाचित सर्वांना माहित नसतील. हे स्टार फ्रूट अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, सोडियम, लोह, फायबर यांसारखे पोषक घटक स्टार फ्रूटमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात आणि ते अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असते. या फळाचे आरोग्य फायदे तर आहेतच. सोबतच हे केस आणि त्वचेसाठीही खूप फायदेही राखेत. चला तर तर मग जाणून घेऊया स्टार फ्रुट खाण्याचे फायदे. उर्फी जावेदला झाला घशाचा संसर्ग, जाणून घ्या कशामुळे होते लेरिन्जाइटिस इंफेक्शन हाडांसाठी फायदेशीर स्टार फ्रुट खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. जी हाडे मजबूत करण्यात विशेष भूमिका बजावते.

News18लोकमत
News18लोकमत

बद्धकोष्ठता स्टार फ्रुट खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. यामध्ये भरपूर फायबर आढळते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि पोटदुखी यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. केसांच्या वाढीसाठी या फळाचे सेवन केल्याने केसांची वाढही सुधारते. यासोबतच केस मजबूत आणि घट्ट होण्यास मदत होते. स्टार फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी आणि ब जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. यासोबतच यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणात आढळतात. पिंपल्स दूर करते बऱयाचदा लोक त्वचेवर पिंपल्सच्या समस्येने त्रस्त असतात. स्टार फ्रुट त्वचेवरील पिंपल्स दूर करण्यास मदत करते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा पिंपल्स होतात. स्टार फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. कोलेस्ट्रॉल शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही स्टार फ्रूटचे सेवन करू शकता. Makhana : मखाना एवढा महाग का असतो? त्यात नेमकं असं काय असतं? रोग प्रतिकारशक्ती स्टार फ्रुट रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्यात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते. हे बीटा-कॅरोटीन शरीरात व्हिटॅमिन-ए चे प्रमाण वाढवण्यास मदत करते. स्टार फ्रुट खाल्ल्याने रोगांना स्वतःपासून दूर ठेवण्यास मदत होते. कारण मजबूत प्रतिकारशक्तीमुळे रोगांचा धोका कमी होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात