Home /News /lifestyle /

पावसाळ्यात जास्त खाऊ नका पालेभाज्या; आजारांना मिळेल निमंत्रण

पावसाळ्यात जास्त खाऊ नका पालेभाज्या; आजारांना मिळेल निमंत्रण

पावसाळ्यामध्ये मेटाबॉलिजम कमी झालेलं असतं.

पावसाळ्यामध्ये मेटाबॉलिजम कमी झालेलं असतं.

पावसाळ्यामध्ये (Monsoon) आजारपण दूर ठेवण्यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहेत. पालेभाज्यांवर या दिवसांमध्ये किड,जीवजंतू वाढतात.

    दिल्ली, 31जुलै : अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळा  (Monsoon) सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. पण, पाऊस म्हणजे, चिखल, घाण, मच्छरांची पैदास, जिवजंतू आणि आजारपण हेही समिकरण ठरलेलं आहे. पावसाळ्यामध्ये आजारपणाचा धोका (Risk of illness)जास्त वाढलेला असतो. त्यामुळेच इम्युनिटी वाढवणारा आहार (Diet For Immunity) घेण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य तज्ज्ञांच्यामते (Health Experts) पावसामध्ये हेल्दी राहण्यासाठी आपली प्रतिकारक्षमता (Immunity) चांगली असणं आवश्यक आहे आणि यासाठीच संतुलित आहारात (Balanced Diet) असायला हवा. मात्र, इतर ऋतूमध्ये चांगल्या वाटणाऱ्या पालेभाज्या न खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. पाहुयात पावसाळ्यात कोणते पदार्थ टाळायला हवेत. पालेभाज्या वर्षभर आपण पालेभाज्या खात असलो तरी, पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाणं टाळा. आहार तज्ज्ञांच्यामते पावसाळ्यामध्ये वातावरण दमट झालेलं असतं. त्यामुळे किटाणू वाढलेले असतात शिवाय हा काळ जीवजंतूंच्याही प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे पावसाळ्यात पालक,मेथी,शेपू सारख्या पालेभाज्या कोबी, फ्लॉवर यासारख्या इतर भाजादेखील खाणं टाळायला हवं. हिरव्या पालेभाज्या पावसाळ्यामध्ये खुप स्वस्त होतात मात्र, या पालेभाज्यांमध्ये इतर ऋतूंपेक्षा जास्त प्रमाणामध्ये माती आणि चिखल देखील लागलेला असतो. जरी पालेभाज्या स्वच्छ धुवून घेतल्या तरी त्यावरचे जंतू निघून जातात असं नाही. (पावसाळ्यात साखर, मीठामध्ये ओलावा तयार होण्याचं No Tension! फॉलो करा या टिप्स) पाणी उकळून प्या पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होतं. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटामध्ये इन्फेक्शन होतं. त्यामुळे कॉलरा, टायफाईड सारखे खराब पाण्यामुळे होणारे आजार होण्याचे धोका जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्यावं. (विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सतीश मेनन यांच्याकडे क्लाससाठी नव्हते पैसे; तरीही पास) तळलेले पदार्थ खाऊन नका पाऊस पडायला लागला की बऱ्याच जणांना भजी, समोसे, वडापाव असे तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, या तळलेल्या पदार्थांमुळे पोटात इन्फेक्शन होऊ शकतं. तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोट फुगणं, गॅसेस वाढणं असे त्रास होतात. (पावसाळ्यात वाढतोय विविध आजारांचा धोका; या Tips वापरून लहान मुलांना ठेवा सुरक्षित) पावसाळ्यामध्ये मेटाबॉलिजम कमी झालेलं असतं. त्यामुळे पदार्थांमधील पोषक घटकांचं शोषण करण्याची आणि अन्न पदार्थ पचवण्याची ताकद नसते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हलका आहार घ्यावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Vegetable

    पुढील बातम्या