कोरोना काळात चहा ठरेल Immunity साठी फायद्याचा, सकाळी अशाप्रकारे प्या Cup of Tea!

कोरोना काळात चहा ठरेल Immunity साठी फायद्याचा, सकाळी अशाप्रकारे प्या Cup of Tea!

तुम्ही रोज पिता तो चहादेखील तुमची इम्युनिटी बूस्ट (Immunity booster tea) करू शकतो. यासाठी तुम्हाला केवळ तुमची चहा करण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै: कोरोनामुळे लोक सध्या आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत. आपली इम्युनिटी, म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने लोक विविध उपाय (Immunity boosting ideas) करत आहेत. इम्युनिटी वाढल्यामुळे कित्येक प्रकारच्या विषाणूंचे संक्रमण तुम्ही टाळू शकता. आपली इम्युन सिस्टिम मजबूत करण्यासाठी कित्येक लोक प्रोटीन शेक किंवा तत्सम पेयांचा (Immunity boosting drinks) वापर करतात. मात्र, अशा कोणत्याही पेयांशिवाय, नैसर्गिक घटकांचा वापर करुनही तुम्ही स्वतःची इम्युनिटी (Boost immunity naturally) वाढवू शकता. विशेष म्हणजे, तुम्ही रोज पिता तो चहादेखील तुमची इम्युनिटी बूस्ट (Immunity booster tea) करू शकतो. यासाठी तुम्हाला केवळ तुमची चहा करण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे.

चहा पिणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे की नाही याबाबत लोकांमध्ये मतभेद आहेत. मात्र, या पद्धतीने चहा कराल, तर तो केवळ हेल्दीच (Healthy Tea) नाही होणार, तर इम्युनिटी बूस्ट करण्यासाठीही मदत करू शकेल. कित्येक लोकांना रोजच्या चहाची सवय झालेली असते. याच सवयीचा उपयोग तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती (Immunity boosting) वाढवण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या चहामध्ये थोडे बदल करावे लागतील. सर्दी-पडसे झाल्यानंतर आलं टाकून चहा करायचा हे आपण पहिल्यापासून करत आलो आहोत. मात्र याव्यतिरिक्त इतरही काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही तुमच्या चहामध्ये टाकल्या, तर त्याचा तुमच्या आरोग्याला अधिक फायदा होईल.

हे वाचा-झटकेदार मिरचीचेही आहेत बरेच फायदे; डायबेटिस असणाऱ्यांनी तर खायलाच हवी

ज्येष्ठमध

आयुर्वेदामध्ये ज्येष्ठमध (Liquorice) नावाच्या वनस्पतीचे कित्येक फायदे सांगितले आहेत. हिंदीमध्ये याला मुलेठी म्हणतात. रोजच्या चहामध्ये काही प्रमाणात ज्येष्ठमध मिसळल्यास, याचा तुमच्या इम्युनिटीसाठी फायदा होतो. आयुर्वेदामध्ये ज्येष्ठमधाला औषधाप्रमाणे वापरले जाते. रोज थोड्या प्रमाणात याचे सेवन केल्यामुळे केवळ सर्दी-पडसेच नाही, तर इतर समस्याही कमी होण्यास मदत होते. याचा फायदा घसा आणि रेस्पिरेटरी सिस्टीम, म्हणजेच श्वासनलिका मजबूत ठेवण्यासाठीही होतो. ज्येष्ठमधात असणाऱ्या अँटी व्हायरल (Anti-Viral) आणि अँटी ऑक्सिडंट्समुळे (Anti-Oxidants) इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते.

हे वाचा-करू नका पोटावर अन्याय; रात्री उपाशी पोटी झोपण्याने मिळतं आजारांना निमंत्रण

लवंग

ज्येष्ठमधासोबतच चहामध्ये लवंग (Clove) वापरल्यानेही फायदा होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होण्यासोबतच, चहाला चांगली चवही येते. शरीरात असलेले कंजेशन (Congestion) कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते.

(Disclaimer: या लेखातील माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारिक आहेत. News18 लोकमत याची पुष्टी करत नाही. या गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संंबंधित तज्ज्ञांशी संपर्क करावा)

First published: July 31, 2021, 10:22 AM IST
Tags: healthtea

ताज्या बातम्या