• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • भारतात नाही प्रोटीनबद्दल जागृती; किती घ्यावं? हेच माहित नसतं

भारतात नाही प्रोटीनबद्दल जागृती; किती घ्यावं? हेच माहित नसतं

1 अंड खाल्ल्याने वजन वाढत नाही.

1 अंड खाल्ल्याने वजन वाढत नाही.

Protein Week 2021: प्रोटीन आहारातला अविभाज्य भाग आहे. पण, दररोज किती प्रोटीन घ्यावं हे माहिती आहे का ?

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 जुलै :  प्रोटीन हा आपल्य़ा आहारातला सगळ्यात महत्वाचा घटक असतो. निरोगी आरोग्यासाठी संतुलीत आहार (Balance Diet) आवश्यक असतो. त्यात प्रोटीनचं (Protein) महत्व जास्त आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठीही (Weight Gain & Weight Loss) फायदेशीर आहे. तर, लहान मुलांच्या आहारात आपण प्रोटीन देतोच. त्यामुळेच 24 ते 30 जुलै दरम्यान प्रोटीन विक साजरा केला जातो. IMRB च्या रिपोर्टनुसार एका सर्वेक्षणानुसार भारतात शहरी भागात 73 टक्के श्रीमंत लोक प्रोटीनयुक्त आहार घेत नाहीत. त्यातील 93 टक्के लोकांनी तर, प्रोटीनची आवश्यकता  किती आहे हे देखील माहिती नाही. भारतात प्रोलट्री प्रोडक्ट (Poultry Products) जास्त खाल्ले जातात असं अजिबात समजू नका कारण, भारतात पोल्ट्री प्रोडक्टचा खप जगाच्या तुलनेत कमी आहे. इथे प्रति व्यक्ती 4 किलो तर, विकसीत देशात 40 किलो आहे. (कोरोना काळात आधी फिरा मग भरा पैसे; कशी वाटली स्किम? फक्त लक्षात ठेवा ‘हे’ नियम) आहारा प्रोटीन का महत्वाचं आहे. प्रोटीन शरीरराच्या प्रत्येक भागात असतं. त्यामुळे वाढ,विकास आणि आजाराशी लढण्याची ताकद मिळते. वयस्कर व्यक्तींना त्यांच्या वजनाच्या तुलनेत 50 ते 60 ग्रॅम प्रोटीन हवं असतं. आपल्या देशात प्रोटीन बाबत जागृकता निर्माण करणं आवश्यक आहे. प्रोटीन केवळ बॉडीबिल्डरने घ्यावं अशी धारणा काहींच्या मनात असते. शिवाय प्रोटीन पचायला वेळ लागतो असंही वाटतं. त्यामुळे प्रोटीन घ्यायला टाळाटाळ केली जाते. (करा स्वत:वर प्रेम,बघा जगणं होईल किती सुंदर) प्रोटीन जास्तीजास्त कसं घ्यावं चिकन, अंडी, मासे यात भरपूर प्रोटीन असतं. चिकन, बदक, टर्की आणि अंडी हे प्रोटीनचे रिच सोर्स आहेत आणि पचायलाही चांगले आहेत. अंडी आणि चिकनमध्ये व्हिटॅमीन ए, बी12, झिंक, आयर्न, सेलेनियम आणि इतरही पोषक घटक असतात. आपल्या प्रत्येक आहारात प्रोटीन असायला हवं असं आहार तज्ज्ञ सांगतात. (जेवनानंतर दोन तासांनी शुगर लेव्हल किती असावी? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत) दिवासाच्या सुरवातील नाश्त्यामध्ये अंड, दूध असायला हवं. तर, जेवणात थोडं प्रोटीन असावं. विविध प्रकारच्या डाळी हा सुद्धा प्रोटीनचा चांगला सोर्स आहेत. याशिवाय ड्रायफ्रुट, स्प्राऊटही घेऊ शकतात. प्रोटीनमुळे आपली इम्युनिटीही चांगली राहते. स्नायूंच्या निर्मीतीसाठी प्रोटीन आहारात असायला हवं.
  Published by:News18 Desk
  First published: