जेवणानंतर दोन तासांनी शुगर लेव्हल किती असावी आणि कसा ओळखावा धोका? वाचा सविस्तर

जेवणानंतर दोन तासांनी शुगर लेव्हल किती असावी आणि कसा ओळखावा धोका? वाचा सविस्तर

डायबेटिसच्या पेशंटच्या रक्तातील साखरेचं प्रमाण काहीही न खाता रिकाम्यापोटी म्हणजे फास्टिंग (Fasting) आणि जेवणानंतर दोन तासांनी तपासलं जातं.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जुलै: भारतात डायबेटिस या आजाराचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण किती असावं याबाबत अनेकदा चर्चा होताना दिसते. कामाचा ताण (Stress), घरगुती टेन्शन्स (Tensions), अनुवंशिकता अशा अनेक कारणांमुळे डायबेटिस (Diabetic) होतो. त्यामुळे आहाराकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आपण जो आहार घेतो त्यावरूनच रक्तातल्या शर्करेचं प्रमाण कमी जास्त होत असतं. ते योग्य राखण्याचा प्रयत्न या पेशंटना करावा लागतो. त्यामुळे हे प्रमाण वैद्यकीय तज्ज्ञांकडून जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही आज तुम्हाला याबाबत अधिक माहिती देणार आहोत. अर्थातच, तज्ज्ञांनी ही माहिती दिली आहे.

यामुळे होतो डायबेटिस

डायबेटिस हा आजार कशामुळे होतो हे अनेकांना माहीत नसतं. जेव्हा शरीरातल्या पॅनक्रिया ग्रंथी (Pancreas) इन्शुलिन हे हॉर्मोन स्रवणं बंद करतात किंवा ते कमी प्रमाणात स्रवतात तेव्हा डायबेटिस हा आजार होतो. त्यानंतर गोड खाण्यावर बंधन येतात कारण शरीरातील ग्लुकोज पचवण्यात इन्शुलिनची महत्त्वाची भूमिका असते. सामान्यपणे रक्तातील साखरेचं (Blood Sugar Level) प्रमाण 70 ते 90 mg/dl असायला हवं. हे प्रमाण वाढलं तर हृदयविकाराचा झटका येणं (Heart Attack), ब्रेन स्ट्रोक, किडनी निकामी होणं आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअरसारखे आजार उद्भवतात. त्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. जनसत्ताने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

लाइफस्टाइलमुळे लिव्हरवर वाढतो दबाव, ‘हे’ 5 पदार्थ रोज खा; वाढेल ताकद

या पातळ्या महत्त्वाच्या

डायबेटिसच्या पेशंटच्या रक्तातील साखरेचं प्रमाण काहीही न खाता रिकाम्यापोटी म्हणजे फास्टिंग (Fasting) आणि जेवणानंतर दोन तासांनी तपासलं जातं. त्यावेळच्या रक्तशर्करेची पातळी किती असायला हवी ते आम्ही सांगणार आहोत.

जेवणाआधीची शुगर लेव्हल

जर एखाद्या व्यक्तीने आठ तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ काहीही खाल्लं नसेल तर त्याच्या रक्तातील शुगर लेव्हल 70 ते 100 mg/dl या दरम्यान असते. ज्यांची ही पातळी 100 ते 126 mg/dl असेल त्या व्यक्ती प्री डायबेटिक या वर्गात मोडतात. आणि हे प्रमाण जर 130 mg/dl किंवा त्यावर असेल तर त्या व्यक्तीला धोका निर्माण झाला आहे असं लक्षात येतं. ही पातळी भयानक असते असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे.

हळदीचा ‘असा’ वापर संपवेल युरिक अ‍ॅसिडचा त्रास; नाही दुखणार सांधे

जेवणानंतरची शुगर लेव्हल

जेवणानंतर दोन तासांनी रक्तातली साखर मोजली तर ती लेव्हल सामान्यपणे 130 ते 140 mg/dl दरम्यान असायला हवी. पण जर शुगरची पातळी त्यावर गेली तर त्या व्यक्तीला डायबेटिस झालेला आहे असं मानलं जातं. जेवणानंतरची शुगर पातळी जर 200 ते 400 mg/dl दरम्यान राहिली तर ते आरोग्याच्या दृष्टिने धोकादायक ठरू शकतं असं डॉक्टर सांगतात. या स्थितीला वैद्यकीय भाषेत हायपोग्लायसिमीया म्हणतात. शुगर वाढली तर डायबेटिसच्या रुग्णाला धोका निर्माण होतो त्यामुळे त्याने वेळेत जेवायला हवं आणि डाएटही पाळायला हवं.

First published: July 23, 2021, 5:15 PM IST

ताज्या बातम्या