मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

AC च्या थंड हवेत दिवसरात्र राहात असाल; तर आधी हे वाचा..

AC च्या थंड हवेत दिवसरात्र राहात असाल; तर आधी हे वाचा..

हाय ब्लड शुगर लेव्हलचा त्रास असेल तर, सतत लघवी येत राहते. याशिवाय थकवा येणं, सतत तहान लागणं, स्कीन ड्राय होऊन खाज येणं, इन्फेक्शन होणं हे त्रास देखील होत राहतात. वजन वाढीचा त्रास असणाऱ्या लोकांमध्ये ब्लड शुगर लेव्हल हाय होऊन डायबिटीस होण्याचा धोकाही जास्त असतो.

हाय ब्लड शुगर लेव्हलचा त्रास असेल तर, सतत लघवी येत राहते. याशिवाय थकवा येणं, सतत तहान लागणं, स्कीन ड्राय होऊन खाज येणं, इन्फेक्शन होणं हे त्रास देखील होत राहतात. वजन वाढीचा त्रास असणाऱ्या लोकांमध्ये ब्लड शुगर लेव्हल हाय होऊन डायबिटीस होण्याचा धोकाही जास्त असतो.

उन्हाळ्या (Summer)च्या दिवसात AC जितका आराम देतो तितकंच त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. जास्त वेळ एसीमध्ये बसल्यामुळे त्वचा कोरडी होते. हा कोरडेपणा दूर करण्यासाठी (To remove Dryness) आपण या पद्धती वापरु शकता.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 21 मे:आजकाल,उन्हाळा सुरु (Early summer)झाला की घराघरांमध्ये एअर कंडिशनर (Air conditioner) सुरु होतो. आजकाल घर किंवा ऑफिस, रेस्टॉरंट किंवा मॉल कुठेही एसी असल्यामुळे बहुतेक वेळा लोकांचा एसीमधला वावर वाढलेला आहे. पण, एसी उन्हाळ्याच्या दिवसात जेवढा दिलासा देतो. तितकेच तो त्वचेलाही नुकसान करतो.

जास्त वेळ एसीमध्ये बसल्यामुळे त्वचा कोरडी होते. कोरडेपणा दूर करण्यासाठी (To remove dryness) आपण खास उपाय करु शकता.

(घरबसल्या COVID-19 चाचणी शक्य, वाचा Home Testing Kit बद्दल सर्व प्रश्नांची उत्तरं)

तीळ तेलाचा वापर

त्वचेचा कोरडेपणापासून बचाव करण्यासाठी तीळ तेलाचा वापरू शकता. यासाठी, एक चमचा तीळ तेलामध्ये एक चमचा साय मिसळा आणि चांगले मिक्स करा. या मिश्रणाने दररोज आपल्या त्वचेची 10 मिनिटं मॉलिश करा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा तर दुर होतोच शिवाय, त्वचा मऊ आणि चमकदार बनेल.

साय आणि गुलाब पाणी

साय लावल्याने त्वचेला मॉइश्चरायझेशन चांगलं होतं. एसीमध्ये बराच वेळ घालवत असाल तर, दररोज झोपण्याआधी चेहरा आणि हात पायाला सायीने मॉलिश करा. दुधाच्या सायीत गुलाबाच्या पाण्याचे काही थेंब टाकले तर, आणखीन फायदा होतो.

(कोरोनाची दुसरी लाट पसरण्यामागे 'ही' लोकं कारणीभूत, ICMR चा मोठा खुलासा)

मध आणि लिंबू

एसीमध्ये जास्त वेळ घालवल्यानंतर त्वचेला आलेला कोरडेपणा घालवण्यासाठी मध आणि लिंबाचा वापर करू शकता. यासाठी,एका चमचा मधात 4 ते 5 थेंब लिंबाचा रस मिसळा. ते मिश्रण आपल्या त्वचेवर लावा आणि पाच मिनिटं मॉलिश करा, नंतर धुऊन टाका. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल.

(माजी मुख्यमंत्र्यांचा कोरोनामुळे मृत्यू,या लाटेत 12हून जास्त MP-MLAनी गमावला जीव)

केळी आणि मध

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी हा पॅक उपयोगी आहे. एक केळं सोलून चांगलं मॅश करा. त्यात एक चमचा मध मिसळा. दोन्ही मिक्स करुन घ्या. ही पेस्ट त्वचेवर 20 मिनिटांसाठी लावा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे एसीत बसून त्वचेवर आलेला कोरडेपणा दूर होईल आणि त्वचा मऊ होईल.

First published:

Tags: Health, Health Tips, Home remedies