Home /News /coronavirus-latest-news /

घरबसल्या COVID-19 चाचणी शक्य, एका क्लिकवर वाचा Home Testing Kit बद्दल सर्व प्रश्नांची उत्तरं

घरबसल्या COVID-19 चाचणी शक्य, एका क्लिकवर वाचा Home Testing Kit बद्दल सर्व प्रश्नांची उत्तरं

ब्लड गृप ‘ए’ आणि ‘बी‘  असण्यांना कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त आहे.

ब्लड गृप ‘ए’ आणि ‘बी‘ असण्यांना कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त आहे.

एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या (Corona Patient) थेट संपर्कात आलेल्या व्यक्तीला घरबसल्या रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid Antigen Tests) करता येईल, असं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (The Indian Council of Medical Research) गुरुवारी सांगितलंय.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 20 मे: एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या (Corona Patient) थेट संपर्कात आलेल्या व्यक्तीला घरबसल्या रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid Antigen Tests) करता येईल, असं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (The Indian Council of Medical Research) गुरुवारी सांगितलंय. तर, ही टेस्ट कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. जाणून घ्या हे किट कसं वापरायचं - किट कुणाला वापरता येईल? पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि लक्षणं (symptomatic) असलेल्या व्यक्तीला होमटेस्टिंग करण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला आहे. इतर कुणीही हे किट वापरून चाचणी करू नये. किट कसे वापरायचे? या किटसोबत ते कसं वापरायचं याबद्दल पूर्ण माहिती दिलेली असेल. तसंच आयसीएमआरने काही व्हिडिओच्या लिंक दिल्या आहेत. त्या व्हिडीओत सांगितलेल्या स्टेप्स फॉलोकरून तुम्ही किट कसं वापरायचं, याबद्दल माहिती मिळवू शकता. या किटमध्ये स्वॅब स्टिक (nasal swab),आधी भरलेलं एक्स्ट्रॅक्शन ट्यूब (pre-filled extraction tube) आणि एक टेस्ट कार्ड (test card) असेल. यासाठी कोणतं App डाऊनलोड करावं लागणार का? या टेस्टसाठी युझर्सना त्यांच्या फोनमध्ये मायलॅब अॅप (mylab app) डाऊनलोड करावं लागेल. तसंच तिथं विचारण्यात आलेली माहिती भरावी लागेल. हे वाचा-महाराष्ट्राने देशाला दिल्या 3 गोष्टी, COVID विरोधात राज्य ठरलं Game Changer! टेस्टिंग करताना कोणती काळजी घ्यायची? -स्वॅबस्टिकच्या वरच्या भागाला हात न लावता ती नाकात 2 ते 3 सेंटिमीटर आत टाका. आणि दोन्ही नाकपुड्यांत पाच वेळा स्टिक नीट फिरवून घेत स्वॅब घ्या. त्यानंतर स्वॅब ट्यूबमध्ये बुडवा. ट्यूबमध्ये ती नीट बुडाली आहे, की नाही याची खात्री करून घ्या. स्वॅब त्या लिक्विडमध्ये मिक्स व्हावी यासाठी किमान 10 वेळा तो नीट मिसळा. ती स्वॅब स्टिक ब्रेक पॉईंटपासून तुटली पाहिजे, याची खात्री करा. त्यानंतर ट्यूबला झाका आणि त्यातील दोन थेंब टेस्ट किटवर टाका. त्यानंतर टेस्टचा निकाल येण्यासाठी 15 मिनिटं थांबा. 15 मिनिटांनी अॅपवर नोटिफिकेशन येईल आणि तिथे तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. मात्र, 20 मिनिटांपर्यंत कोणताही रिपोर्ट आला नाही, आणि त्यानंतर रिपोर्ट आला, तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. अशा पद्धतीने चाचणी केल्यास ओळख उघड होईल का? आयसीएमआरच्या गाइडलाइन्सनुसार, मोबाइल अॅपवरील डेटा आयसीएमआरच्या कोविड -19 टेस्टिंग पोर्टलसह (ICMR Covid-19 testing portal) कनेक्ट केलेल्या एका सुरक्षित सर्व्हरमध्ये सेव्ह होईल. रुग्णांच्या गोपनीयतेस कोणताही धोका नसल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. हे वाचा-माजी मुख्यमंत्र्यांचा कोरोनामुळे मृत्यू,या लाटेत 12हून जास्त MP-MLAनी गमावला जीव टेस्टचा रिझल्ट आल्यानंतर काय होणार? सेल्फटेस्टिंग किटमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसरी चाचणी करायची गरज नाही. तुमचा हा रिपोर्ट ग्राह्य धरला जाईल. निगेटिव्ह आलेले आरटी-पीसीआरटेस्ट करू शकतात. कोरोनाची लक्षणे असेल मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आल्यासत्यांना कोरोना संशयित रुग्ण म्हणून गृहीत धरले जाईल. रिपोर्ट आल्यानंतर काय करायचे? मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी आणि नोंदणीसाठी वापरल्या गेलेल्या मोबाइल फोनद्वारे चाचणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्व युझर्सना टेस्ट स्ट्रिपचा फोटो काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांना आयसीएमआर आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Health & Family Welfare) प्रोटोकॉलनुसार होम आयसोलेट (home isolation) होण्याचा आणि काळजी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चाचणी किट, स्वॅब आणि इतर सामग्रीच्या विल्हेवाटीसाठी (disposal) किटनिर्मात्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona patient, Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या