• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • COVID-19 Second Wave: कोरोनाची दुसरी लाट पसरण्यामागे 'ही' लोकं कारणीभूत, ICMR चा मोठा खुलासा

COVID-19 Second Wave: कोरोनाची दुसरी लाट पसरण्यामागे 'ही' लोकं कारणीभूत, ICMR चा मोठा खुलासा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाकार माजला आहे. या लाटेमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान ही लाट पसरण्यामागे नेमकं कारण काय होतं याबाबत ICMR ने खुलासा केला आहे

  • Share this:
नवी दिल्ली, 20 मे: कोणत्याही रोगाचं संक्रमण कसं पसरतं याचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण जर आपण प्रसाराचं कारण ओळखलं आणि त्याला पायबंद घातला तर आपल्याला आजारावर नियंत्रण ठेवणं सोपं पडतं. त्यामुळे मेडिकल क्षेत्रात (Medical) अनेक सर्व्हे केले जातात आणि त्याचे अहवाल सार्वजनिक केले जातात. असाच आयसीएमआरचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्याबद्दल मिंटने (The Mint) वृत्त दिलं आहे. या अहवालानुसार, . 'दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पसरलेल्या संक्रमणाला प्रवासी मजूर (Migrant Labour) आणि धार्मिक कार्यक्रमांतील (Religious Gathering) गर्दी कारणीभूत होती. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या काळात घेतलेल्या सँपल्समध्ये SARS-CoV-2 विषाणूच्या व्हेरियंट्समध्ये स्वतंत्र अमिनो असिड म्युटेशन्स सापडली होती. आताच्या विषाणूच्या परिस्थितीला हे म्युटेशनच कारणीभूत ठरल्याचं आता दिसून येतंय.' असं या अहवालात म्हटल्याचं मिंटच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतात B.1.1.7 लिनिएज, व्हेरियंट ऑफ कन्सर्न (variant of concern VOC) आणि B.1.351 लिनिएज हे कोरोना विषाणूचे तीन व्हेरियंट सापडले. या व्हेरियंटमुळे अँटिजेनिक ड्रिफ्ट, संक्रमणाची क्षमता वाढ आणि इम्युन एस्केप (विशेषत:B.1.351 याची) प्रक्रिया वाढली असं आयसीएमआरनं म्हटलं आहे. नुकतंच भारतीय SARS-CoV-2 सिक्वेन्समध्ये नवं लिनिएज (B.1.617) सापडलं असून त्यातील स्पाईक प्रोटीनमध्ये E484Q आणि L452R ही म्युटेशन (Mutations) सापडली आहेत. यांना साधारणपणे डबल म्युटंट म्हटलं जातं आणि ते अधिक संक्रामक असतं असं मानलं जातं, असं या अहवालात म्हटलं आहे. हे वाचा-'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन...?', दिल्लीनंतर मुंबईत पोस्टरबाजी, पाहा PHOTOS या अभ्यासात असंही आढळलं की जानेवारी ते ऑगस्ट 2020 दरम्यान SARS-CoV-2 चा सिक्वेन्स अनॅलसिस केला असता स्पाईक प्रोटिनमध्ये E484Q म्युटेशन (Spike Protein) आढळून आलं. हे सिक्वेन्स मार्च ते जुलै 2020 दरम्यान महाराष्ट्रात आढळून आले होते. आणखी एक इम्युन एस्केप म्युटेशन ज्यात स्पाइक प्रोटिनमध्ये N440K अमिनो अॅसिड होतं ते तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसाममध्ये मार्च 2020 मध्ये आढळून आलं होतं. हे वाचा-देशातील कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार आणि कधी येणार तिसरी लाट? आयसीएमआरने (ICMR) गुरुवारी सांगितलं की कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला जर कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर तो घरच्याघरी रॅपिड अँटिजेन टेस्ट करू शकतात.आयसीएमआरने घरी टेस्ट करण्यासंबंधी स्वतंत्र अॅडव्हायजरी प्रसिद्ध केली असून त्यात त्यांनी सांगितलं की टेस्टिंग किट तयार करणाऱ्या मॅन्युफॅक्चररने दिलेल्या पद्धतीनुसारच घरी टेस्टिंग करावं.

First published: