नवी दिल्ली,20 जुलै : कोरोना साथीमुळे,लोक गेल्या 2 वर्षांपासून वर्क फ्रॉम होम (Work From Home) आणि ऑनलाइन क्लासेस (Online Classes)मुळे कामात बिझी आहेत. सतत कंम्युपट आणि मोबाईल पाहण्यामुळे स्क्रीनची वेळ पूर्वीच्या तुलनेत अनेक पटीने वाढली आहे. ज्यामुळे डिजिटल आय स्ट्रेन होण्याचा धोकाही वाढत आहे. स्क्रिनमुळे डोळ्यांना होणाऱ्या त्रसाला डिजिटल आय स्ट्रेन म्हणतात.
डिजिटल आय स्ट्रेनमुळे डोळ्यांमध्ये वेदना,लालसरपणा,लक्ष केंद्रित करण्यास अडण येणं,नजर अंधुक होणं,मान दुखणं अशी लक्षणं दिसतात. पाहूयात डिजिटल आय स्ट्रेनपासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो.
(जगातली सगळ्यात फिट महिला टिया क्लेयर टूमी; ‘हे’ आहे तिचं फिटनेस Secret)
20-20-20 रूल करा फॉलो
बर्याच वेळ स्क्रिनसमोर बसून काम करत असाल तर, 20-20-20 नियम पाळा. स्क्रिनवर २० मिनिटं काम केल्यावर २० फूट अंतरावर पहा आणि त्यानंतर २० सेकंद विश्रांती घ्या. डोळे बंद करून डोळ्यांना आराम द्या.
योग्य अंतर आवश्यक
स्क्रिन आणि डोळे यांच्या दरम्यान योग्य अंतर राखणं महत्वाचं आहे. कमीतकमी 1 फूट अंतर आवश्यक आहे. स्किनची उंची डोळ्यांपेक्षा कमी असणं चांगलं.
(हृदय निरोगी ठेवायचंय? सकाळच्या नाश्त्यात करा 'या' गोष्टींचा समावेश)
योग्य प्रकाशात काम करा
एखाद्या अंधाऱ्या खोलीत काम करत असाल तर, स्क्रीनच्या प्रकाशाचा वाईट परिणाम आपल्या डोळ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे काम करताना खोलीत पुरेसा प्रकाश ठेवा.
(आश्चर्यच! आंबटही लागतं गोड; Miracle Fruit चवच बदलून टाकतं, कशी होते ही जादू?)
एयर क्वालिटीची काळजी घ्या
जिथे काम करत आहात तिथे पोल्यूशचा त्रास नसावा. त्यामुळे डोळ्यांच्या जळीचा त्रास जास्त होऊ शकतो. आय प्रोटेक्टर चष्मा वापरा मोबाईल आणि लॅपटॉपवर जास्त काम कराव लागत असेल तर, आय प्रोटेक्टर चष्मा वापरावा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eyes damage, Lifestyle, Work from home