केपटाऊन, 20 जुलै : प्रत्येक फळाला (Fruit) स्वतःची एक चव असते. काही फळं गोड (Sweet) असतात, काही आंबट (Sour Taste) तर काही तुरटही असतात. पण असं एक फळ आहे, जे चक्क चवच बदलतं. आंबट चवीच्या पदार्थांची चव गोड चवीत बदलतं. त्यामुळे त्याला मिरॅकल फ्रुट (Miracle Fruit) अर्थात जादूई फळ असं म्हटलं जातं.
दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) घानामध्ये (Ghana) आढळणाऱ्या या फळाचं शास्त्रीय नाव आहे Synsepalum dulcificum. या झाडाला द्राक्षांसारखी छोटी छोटी फळं येतात. मिरॅकल फ्रूट खाल्ल्यानंतर तासाभराच्या आत काहीही खाल्लं तरी गोड लागतं. तुम्ही लिंबाचा रस प्या किंवा अगदी आंबट असलेल्या व्हिनेगारची चव घ्या, काहीही तोंडात गेलं तरी गोडच लागतं. हे ऐकायला जितकं अद्भुत वाटतं, तितकाच हे फळ खाल्ल्यानंतरचा अनुभवही अद्भुत आहे.
या फळामधली प्रोटीन्स आपल्या टेस्ट बड्समध्ये बदल घडवून आणतात. या फळात मिरॅकुलिन (Miraculin Protein) नावाचं प्रोटीन असतं. कोणत्याही पदार्थाची चव गोड करण्याची क्षमता या प्रोटीनमध्ये असते.
हे वाचा - Yuck! हे 10 विचित्र पदार्थ अतिशय चवीने खातात चिनी लोक! तुम्ही विचारही केला नसेल
जेव्हा आपण काही आंबट खातो, तेव्हा त्याचा pH आपल्या जिभेवरच्या मिरॅकुलिनला बांधून ठेवतो. त्यामुळे जिभेला गोड चव लागत नाही. pH ची पातळी कमी होते तेव्हा गोड मिरॅकुलिन प्रोटीन सक्रिय होतं आणि गोड चव लागू लागते. जेव्हा मिरॅकुलिन प्रोटीनची पातळी उच्च होते, तेव्हा आपण कितीही आंबट खाल्लं, तरी आपल्याला गोडच लागतं. युनिव्हर्सिटी ऑफ टोकियोच्या संशोधकांचं म्हणणं आहे, की मिरॅकुलिन प्रोटीनने गोडीसंदर्भातली व्याख्या बदलली आहे.
1968 मध्ये जगाला पहिल्यांदा या फळांबद्दल कळलं. त्यांची उपयुक्तता कळल्यावर या फळांपासून टॅब्लेट्स तयार केल्या जाऊ लागल्या. मिरॅकुलिन प्रोटीन टॅबलेटच्या स्वरूपात खाल्ल्यावर गोड स्वाद कळण्याची क्षमता वाढते.
हे वाचा - खरंच तुम्ही खात असलेल्या Cadbury Chocolate मध्ये Beef आहे?
या फळांची टिकवणक्षमता (Shelf Life) जास्त नाही. त्यामुळे ही फळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं सोपं नसतं. या झाडांची लागवडही सोपी नसते. ही फळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायची असतील, तर ती रात्रीच्या काळात पाठवली जातात. त्यामुळे शक्यतो फळं पाठवण्याऐवजी मिरॅकुलिन टॅबलेट्सच (Miraculin Tablets) पाठवल्या जातात. अर्थात फळाची चव टॅबलेटला येत नाही. तरीही लोक या टॅबलेटचा वापर करतात. कारण त्यामुळे आहारातला साखरेचा (Sugar) वापर कमी करता येतो. त्यामुळे डाएटसाठी ही फळं चांगली मानली जातात. मात्र ही फळं शिजवली, तर त्यातलं प्रोटीन नष्ट होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Fruit, Lifestyle, Taste buds