हृदय निरोगी ठेवायचंय? सकाळच्या नाश्त्यात करा 'या' गोष्टींचा समावेश
हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी व्यायामासह हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी, हेल्दी ब्रेकफास्ट सर्वात महत्त्वाचा आहे. त्यासाठी या 6 पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा.
ब्राऊन ब्रेड सँडविच: आपण आपल्या नाश्त्यात व्हाइट ऐवजी ब्राऊन ब्रेड सँडविच खाल्लं तर फायदा होईल. हे सँडविच बनवण्यासाठी आपण बर्याच प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा वापर करू शकता.
2/ 6
स्प्राउट चाट: स्प्राउट हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. स्प्राउट्समध्ये भरपूर पोषकतत्त्व असतात जे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. सकाळच्या नाश्त्यात आपण स्प्राउट्स खाऊ शकता.
3/ 6
फळांचा रायता: नाश्त्याच्या वेळी लो फॅट दही खाऊ शकता. फळाबरोबर दही खाल्लं तर हृदय निरोगी राहते. यामध्ये फॅट्स कमी असतं आणि अँटी-ऑक्सिडेंट देखील असतात.
4/ 6
इडली ओट्स: ओट्समध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त आहे. आपण दूध आणि फळांसह ओट्स खाऊ शकता. आपण ओट्स इडलीही बनवू शकता.
5/ 6
मल्टीग्रेन इडली: मल्टीग्रेन इडलीमध्ये ज्वारी, बाजरी, ओट्स, मेथीचे दाणे आणि गव्हाचे पीठ यासारख्या फायदेशीर धान्यांचा समावेश असतो.
6/ 6
व्हाईट एग ऑम्लेट: नाश्त्यात भरपूर प्रोटिन्सने समृद्ध अंडी समाविष्ट करण्याचे बरेच फायदे आहेत. अंडी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा कायम राहते