मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पावसाळ्यात असावा Vit C युक्त आहार; Immunity होईल मजबूत! काय खाल काय टाळाल?

पावसाळ्यात असावा Vit C युक्त आहार; Immunity होईल मजबूत! काय खाल काय टाळाल?

व्हिटॅमीन सी युक्त आहाराने आपली इम्युनिटी वाढते.

व्हिटॅमीन सी युक्त आहाराने आपली इम्युनिटी वाढते.

आजारपण दूर ठेवण्यासाठी आपली रोग प्रतिकारशक्ती (Immunity) चांगली असायला हवी याकरता एक्ससाइज करण्याबरोबर हेल्दी डायटकडे (Health Diet) विशेष लक्ष द्यायला हवं.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) आपण सगळेजण आता इम्युनिटीकडे (Immunity) लक्ष द्यायला लागलेला आहोत. पावसाळ्यामध्ये (Monsoon) कोरोना बरोबरच इतरही इन्फेक्शन (Infection) होत असतात. यामुळेच या काळामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) चांगली ठेवायला हवी. यासाठीच आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. पावसाळ्यामध्ये आजारपणाचा धोका (Risk of illness)जास्त वाढलेला असतो. त्यामुळेच इम्युनिटी वाढवणारा आहार (Diet For Immunity) घेण्याचा सल्ला दिला जातो.

आरोग्य तज्ज्ञांच्यामते (Health Experts) पावसामध्ये हेल्दी राहण्यासाठी आपली प्रतिकारक्षमता (Immunity) चांगली असणं आवश्यक आहे आणि यासाठीच संतुलित आहारात (Balanced Diet) असायला हवा. पावसाळ्यामध्ये व्हिटॅमीन सीयुक्त फळं आणि भाज्या (Vitamin C Rich Fruit & Vegetable) खायला हव्यात. व्हिटॅमीन सी युक्त आहाराने आपली इम्युनिटी वाढते आणि मेटाबॉलिझम चांगलं होतं. यामुळे अनेक प्रकारचे रोग दूर राहतात. पहा पावसाळ्यात कोणत्या भाज्या आणि फळं खाण्याने फायदा होतो.

(बॅक्टेरियांमुळे दीर्घायुष्य; शतक गाठणाऱ्या व्यक्तींच्या आतड्यात असतात हे जीवाणू)

ब्रोकोली

ब्रोकोली खाण्याने रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. सल्फॉराफेन आणि व्हिटॅमिन सी ब्रोकोलीमध्ये असतं. जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे रोग दूर पळतात.

संत्र

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी, फायबर, थियामीन आणि पोटॅशियम सारखे पदार्थ असतात. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतं. त्यामुळे डायबेटीस आणि लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी संत्र खाणं फायदेशीर आहे.

(Kaolin clay: ही माती त्वचेवर करेल चमत्कार; नितळ, कुठे मिळेल, कशी वापराल?)

लिंबू

लिंबामध्ये व्हिटॅमीन सी आणि सायट्रिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे इम्युनिटी चांगली होते. यामधील सायट्रिक ऍसिडमुळे फॅट्स कमी होतात. लिंबामुळे वजन कमी होतं. उत्तम आरोग्यासाठी कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून रिकाम्यापोटी घेतल्याने वजन कमी होतं.

आवळा

आवळा व्हिटॅमीन सीचा सगळ्यात मोठा स्रोत आहे. यामध्ये आयर्न फॉलिक अ‍ॅसिड अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट जास्त प्रमाणात असतं. आयुर्वेदानुसार आवळा वात, पित्त आणि कफ नाशक मानलं जातं.

(पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा)

पपई  

पपईमध्ये नॅचरल लॅक्सेटिव्ह असतं. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते पपईत व्हिटॅमीन सी असतं, शिवाय अ‍ॅन्टीऑक्सिडन्टमुळे शरीर निरोही राहतं. पोटासंबंधीचे सगळे त्रास कमी होतात.

पेरू

पेरूमध्ये व्हिटॅमीन सी बरोबर फायबर आणि पोट्याशियम सारखे खनिज पदार्थ भरपूर असतात. पेरू खाण्याने रोग प्रतिकारशक्ती चांगली होऊन अनेक आजार दूर राहतात. पेरू खाल्ल्याने हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. ब्लड शुगर लेव्हल कमी होते.

(जगातील सर्वात महागडे पदार्थ; किंमत वाचूनच येईल चक्कर)

शिमला मिरची

शिमला मिरचीमध्ये विटामिन सी, ई, ए, फायबर, पोटॅशियम सारखे महत्त्वाचे घटक असतात त्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं. पचनशक्‍ती चांगली राहते आणि इम्युन सिस्टिम देखील चांगली राहते.

First published:

Tags: Fruit, Immun, Lifestyle, Monsoon, Vegetables