मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बॅक्टेरियामुळे लाभतं दीर्घायुष्य; 100 वर्षं जगणाऱ्या व्यक्तींच्या आतड्यांमध्ये असतात हे जिवाणू

बॅक्टेरियामुळे लाभतं दीर्घायुष्य; 100 वर्षं जगणाऱ्या व्यक्तींच्या आतड्यांमध्ये असतात हे जिवाणू

नेचर जर्नलमध्ये (Nature Journal) नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात दीर्घायुष्याचं रहस्य काही अंशी उलगडलं आहे.

नेचर जर्नलमध्ये (Nature Journal) नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात दीर्घायुष्याचं रहस्य काही अंशी उलगडलं आहे.

नेचर जर्नलमध्ये (Nature Journal) नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात दीर्घायुष्याचं रहस्य काही अंशी उलगडलं आहे.

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट: आधुनिक काळात सरासरी मानवी आयुर्मान वाढलं आहे. अत्याधुनिक औषधोपचार, प्रगत आरोग्य सुविधा ही त्यामागची काही कारणं आहेत. त्यामुळे 100 वर्षांपेक्षा (Hundred Years Age) अधिक वय असलेल्या लोकांचं प्रमाण वाढलं आहे. या लोकांच्या निरोगी आयुष्याचं रहस्य काय याबाबत सर्वांनाच कुतूहल असतं. नेचर जर्नलमध्ये (Nature Journal) नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या जपानमधल्या (Japan) एका नव्या संशोधनात हे रहस्य काही अंशी उलगडलं आहे. या संशोधनानुसार, 100 वर्षांपर्यंत किंवा त्याहून अधिक वर्षं जगणाऱ्या व्यक्तींच्या आतड्यांमध्ये विशिष्ट प्रकारचं ‘चांगले जिवाणू’(Good Bacteria) असतात. या जिवाणूंमुळे वाढत्या वयातही या लोकांची प्रकृती (Health) चांगली राहते. हे चांगले जिवाणू अशा काही पित्त रसाच्या उत्पत्तीला मदत करतात ज्यामुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. या आधी 2009 साली डायबेटीस केअर जर्नलमध्ये अशाच प्रकारचा एक अभ्यास अहवाल प्रकाशित झाला होता. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 100 वर्षं आणि त्यापुढच्या वयाच्या 160 व्यक्तींचा या अभ्यासात समावेश होता. या लोकांचं सरासरी वय 107 वर्षं होते. यामध्ये 85 ते 89 वर्षं वयाचे 112 जण, तर उर्वरित 100 पेक्षा जास्त वयाचे होते. त्याचबरोबर 21 ते 55 वर्षं वयाच्या 47 लोकांचा एक गट होता. या तीन गटांतल्या लोकांच्या आतड्यांमधल्या जिवाणूंचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. याबाबत माहिती देताना टोकियोमधील (Tokiyo) कीयो युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या मायक्रोबायोलॉजी आणि इम्युनॉलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. केनिया होंडा म्हणाले, की 100 वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींमध्येच काही चांगले जिवाणू आढळतात. या चांगल्या जिवाणूंमुळे दीर्घ आयुष्यातही ते निरोगी राहत असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा माणसांच्या दीर्घायुष्याचं हेच रहस्य असल्याचं मात्र सिद्ध झालेलं नाही. आतड्यांमध्ये राहणारे जिवाणू आणि सूक्ष्मजीव यांना गट मायक्रोबाइम म्हणतात. वयोमानानुसार आपलं आरोग्य चांगलं राखण्यास ते मदत करतात. तरुण वयात आतड्यांमध्ये अशा जिवाणूंचं वैविध्य कमी असतं. वाढत्या वयाबरोबर त्यात वाढ होते. त्यामुळे शंभरी गाठलेल्या वृद्धांमध्ये अशा जिवाणूंचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळे त्यांना आजार होण्याचे प्रमाण कमी असतं, असं या अभ्यासात आढळलं आहे. या जिवाणूंच्या विकासाची प्रक्रिया कळली तर भविष्यात उपचार पद्धतीत याचा वापर करून आपण अनेक लोकांना वाचवू शकतो. भविष्यात लोकांना निरोगी राखण्यासाठी हे जिवाणू उपयुक्त ठरतील, असा विश्वास डॉ. केनिया होंडा यांनी व्यक्त केला. पोटाचे सगळे आजार बरे करतील चारोळे; दुधाबरोबर ‘या’ पद्धतीने खा संशोधकांनी या तिन्ही वयोगटांतल्या चयापचय प्रक्रियेनंतर निर्माण होणाऱ्या द्रव्यांचा अभ्यास केला. त्यात असं दिसून आलं, की 100 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या आतड्यांमध्ये विकसित झालेले जिवाणू एका विशिष्ट प्रकारचं पित्त आम्ल बाहेर टाकतात. ते इतर वयाच्या लोकांच्या आतड्यांमध्ये निर्माण होत नाही. पित्ताशयात (Gall Bladder) जमा होणारा हा पिवळसर हिरव्या रंगाचा तरल द्रवपदार्थ असतो. या रासायनिक द्रवामुळे अन्न पचन होण्यास मदत होते. विशेषतः चरबीचं ज्वलन होतं. यकृतातलं पित्त आम्ल आतड्यांपर्यंत पोहोचते आणि आतड्यांमधले जिवाणू ते रासायनिक प्रक्रियेनं बदलून त्याचं रूपांतर सेकंडरी बाइल अॅसिडमध्ये (Secondary Bile Acid) करतात. या सेकंडरी बाइल अॅसिडला आयसोलोलिथोकोलिक अॅसिड (Isolo lithocholic acid -isoalloLCA) असं म्हणतात.

वाढत्या वयात उत्साह टिकून राहण्यासाठी रोज खा ही Enery booster; सेक्स ड्राइव्ह वाढेल

रसायन निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा शोध घेतल्यानंतर हे जिवाणू ओडोरिबॅक्टरसी (Odori Bacteracy) कुटुंबातील असल्याचं संशोधकांना आढळलं. आयसोलोलिथोकोलिक अॅसिडमध्ये (Isolo lithocholic acid -isoalloLCA) शक्तिशाली प्रतिजैविक निर्मिती क्षमता असते. त्यामुळे ते शरीरात अतिसार आणि पोटाच्या विकारांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल नावाच्या जिवाणूंची वाढ रोखतात. तसंच प्रतिजैविक प्रतिरोधक जिवाणूंची वाढही ते रोखते. या आयसोलोलिथोकोलिक अॅसिडमुळे 100 वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या शरीरात चांगल्या जिवाणूंची निर्मिती होते आणि वाईट जिवाणूंच्या वाढीला आळा बसतो. त्यामुळे या व्यक्तींच्या आतड्यांमध्ये संसर्ग होत नाही. तसंच या व्यक्ती आजारी पडण्याचं प्रमाणही कमी असते.
First published:

पुढील बातम्या