मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Kaolin Clay: ही माती त्वचेवर करेल जादू; काय आहे हे आणि कशी वापरायची?

Kaolin Clay: ही माती त्वचेवर करेल जादू; काय आहे हे आणि कशी वापरायची?

काओलिन क्ले ऑयली त्वचेसाठी जास्त फायदेशीर आहे.

काओलिन क्ले ऑयली त्वचेसाठी जास्त फायदेशीर आहे.

काओलिन क्ले (Kaolin Clay) म्हणजे एक प्रकारची सफेद रंगाची चिनी माती आहे. आठवड्यातून एकदा याचा मास्क (Face Mask) वापरून आपला चेहरा सुंदर आणि तजेलदार करू शकतो.

नवी दिल्ली, 03 ऑगस्ट :  आपली त्वचा सुंदर मुलायम (Beautiful & Soft Skin) रहावी असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी पण तिची काळजीही  (Skin care) घेतो. वेगवेगळे फेसपॅक,क्रिम,होमरेमेडीज वापरतो. पण, त्वचेच्या पोता प्रमाणे  (Skin Type) तिची काळजी घ्यावी लागते. कोरड्या त्वचेसाठी वापरले जाणारे उपाय तेलकट त्वचेसाठी चालत नाहीत. ऑयली त्वचेसाठी (Oily Skin) आपण मुलतानी माती वापरली असेल.  त्याऐवजी काओलिन क्ले  (Kaolin Clay) म्हणजेच चिनी माती वापरून पाहा. आपली त्वचा सुंदर, कोमल, मुलायम करायची असेल तर काओलिन क्ले  जरूर वापरा. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम सारखं महत्त्वाचे घटक असतात. प्रदूषणामुळे त्वचेवर परिणाम (Pollution Effect On Skin) झाला असेल तर, या क्लेमुळे फायदा होऊ शकतो. आठवड्यातून एकदा याचा मास्क (Face Mask) वापरून आपला चेहरा सुंदर आणि तजेलदार करू शकता.

(पोटाचे सगळे आजार बरे करतील चारोळे; दुधाबरोबर ‘या’ पद्धतीने खा)

काओलिन क्ले म्हणजे एक प्रकारची सफेद रंगाची चीनी माती आहे. ब्युटीशियन या क्लेचा वापर मेकअप, केस आणि दातांच्या स्वच्छतेसाठी देखील करतात. काओलिन क्ले ऑयली त्वचेसाठी जास्त फायदेशीर आहे. यामुळे चेहर्‍यावर साठलेली घाण निघून जाते आणि त्वचा चमकदार होते.

(रोज 1 ग्लास मोसंबीचा रस घेतल्याने हाडं होतील मजबूत, निरोगी डोळे आणि..वाचा फायदे)

काओलीन क्लेमुळे अंगाची दुर्गंधी कमी होते. नियमित वापर केल्यास त्वचेवर शायनिंग येते. चेहऱ्यातील अतिरिक्त तेल खेचून घेते. नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होतात. आवश्यक पोषक घटक शोषले जातात. काओलिन क्ले अतिशय मऊ आणि नरम असते. सफेद, हिरव्या, गुलाबी अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये मिळते. आपल्या त्वचेच्या पोतानुसार हिचा वापर करावा. काओलिन क्ले आपल्या त्वचेची  PH लेव्हल देखील चांगली ठेवते.

(हेल्दी असलं तरी कच्चं सॅलडही आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक कारण...)

फेस मास्क

एका भांड्यामध्ये काओलिन क्ले घ्या. यामध्ये अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आणि आवश्यकता असल्यास बदाम तेल घाला. हे मिश्रण चांगलं एकत्र करून चेहर्‍यावर लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. यानंतर मॉइश्चरायझर लावा.

(Vastu Tips : तुमच्या घरातील 'नको त्या वस्तू' ठरतायेत तुमच्या अपयशाचं कारण)

स्क्रब

काओलिन क्ले चेहऱ्यावर साठलेली घाण शोषून घेऊन चेहरा नितळ बनवते.

काओलिन क्लेचा स्क्रबही बनवता येतो. चेहऱ्यावर ब्लॅहेड्स असतील तर, काओलिन क्ले आणि ऑरगॅनिक एलोवेरा जेल एकत्र करून आपल्या चेहऱ्यावर लावा. सुकल्या नंतर धुऊन टाका. यामुळे ब्लॅकहेड्स आणि डेड स्कीन निघून जाईल. मात्र, ड्राय स्कीन असलेल्या लोकांनी वापरताना जास्त काळजी घ्यावी. याच्या वापरामुळे ड्राय स्कीन आणखीन ड्राय होऊ शकते.

(ना डाग पडणार, ना ओरखडे; अशा पद्धतीने साफ करा तुमचा चष्मा)

बॉडी क्लिंजर

काओलीन क्ले एरंडेल तेल, नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल, लवंग तेल आणि शीया बटर एकत्र करून एकजीव होईपर्यंत चांगलं फेटा. त्यानंतर हे मिश्रण शरीरावर लावा. हलक्या हाताने चाळा. हे उत्तम बॉडी क्लिंजर आहे. यामुळे त्वचा मऊ होते.

First published:

Tags: Home remedies, Lifestyle, Skin care