मागच्या काही काळापासून भारताचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुलचं (KL Rahul) नाव सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीसोबत जोडलं जात आहे. पण आता केएल राहुल पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल सोनम बाजवामुळे चर्चेत आला आहे. (Sonam Bajwa instagram)
2/ 5
राहुल आणि आथिया यांनी आपल्या नात्याबाबत कधीच जाहीर वक्तव्यं केलेली नाहीत, पण सोशल मीडियावर त्यांनी अनेकवेळा त्यांच्यात मैत्रीपेक्षाही जास्त नात असल्याचे इशारे दिले आहेत. (Athiya Shetty/Instagram)
3/ 5
आता केएल राहुल याने सोनम बाजवाच्या एका फोटोवर कमेंट केली आहे. यानंतर अनेकांनी राहुलवर आथियाला धोका दिल्याचा आरोप केला आहे. (Athiya Shetty/Instagram)
4/ 5
सोनमने एक फोटो शेयर केला, यात तिने 'सूर्यास्त होत आहे आणि तुझ्याबद्दल विचार करत आहे,' असं कॅप्शन दिलं आणि बदामाची इमोजी शेयर केली.
5/ 5
सोनमच्या या फोटोवर केएल राहुलने कमेंट केली. फक्त एक फोन कॉल लांब आहे, असं राहुल म्हणाला. पण या कमेंटनंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. (Sonam Bajwa instagram)