मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बाळगू नका संकोच; मुलांसाठी लैंगिक शिक्षण महत्वाचं; या वयात द्यावी कल्पना

बाळगू नका संकोच; मुलांसाठी लैंगिक शिक्षण महत्वाचं; या वयात द्यावी कल्पना

मुलांबरोबर लैंगिक संबंधाबद्दल चर्चा करायला हरकत नसते.

मुलांबरोबर लैंगिक संबंधाबद्दल चर्चा करायला हरकत नसते.

आपल्या मुलांबरोबर सेक्स (Sex) बद्दल बोलत असाल तर, त्यांना काही गोष्टी समजावून सांगणं महत्वाचं आहे. या गोष्टी मुलांचे वय (Age) आणि त्यांच्या विकासा (Development)च्या पातळीवरही अवलंबून असतात.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 24 मे : लैंगिक संबंधां (Sex) बद्दल मुलांबरोबर बोलणं सुरु करणं आणि वाढत्या वयाबरोबर ही चर्चा सुरु ठेवणं. मुलांना लैगिक शिक्षण (Sex Education to Children) देण्याच्या दृष्टीने महत्वाची रणनीती आहे. त्यामुळे मुलांच्या मनात गैससमज (Misunderstanding) निर्माण होण्याबद्दलची पालकांच्या मनातली भीती कमी होते.

मूलं जेव्हा, किशोरवयात येतात तेव्हा पालकांना या गोष्टीची कल्पना असते की, त्यांच्या मुलांच्या मनात लैंगिक संबंधांबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे आणि ते या गोष्टी सहजपणे समजू शकतात. त्यामुळे मुलांबरोबर लैंगिक संबंधाबद्दल चर्चा करायला हरकत नसते. पण, त्यांना काही गोष्टी समजावून सांगणं महत्वाचं आहे.

AboutKidsHealth  च्या अहवालानुसार प्रत्येक मूल भिन्न असलं. तरी मुलांना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर लैंगिक संबंध (Sex) आणि पुनरुत्पादना (Reproduction)बद्दल सांगणं आवश्यक आहे. लैंगिक संबंध आणि सेक्सबद्दल मुलांना कोणत्या वयात कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे जाणून घेऊयात.

(अबब ! दिड लाख रुपये किलोचे मशरुम?;कॅन्सरही करतील बरा)

लहान मुलं :13 ते 24 महिने

टॉडलर्सना जननेंद्रियासह शरीराच्या सर्व भागांची नावं माहित असणं आवश्यक आहे. शरीराच्या अवयवांसाठी योग्य नावं वापरण्याची मुलांना माहिती असायला हवी. कोणताही प्रॉब्लेम,जखम किंवा लैंगिक गैरवर्तन याबद्दल त्यांना बोलता येऊ शकतं. त्यामुळेचं जननेंद्रिय म्हणजे, इतर कोणत्याही अवयवाप्रमाणेच सामान्य आहेत, हे समजण्यास देखील त्यांना मदत होईल. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स आणि प़ॉजिटीव्हीटीही वाढते. दोन वर्षांच्या मुलांना पुरुष आणि स्त्री यांच्यातील फरक कळायला लागतो. त्यांना कोण पुरुष आहे आणि कोण महिला आहे हे समजत असतं.

प्रीस्कूल : 2 ते 4 वर्षे वयोगट

2 ते 4 वयोगटातील बहुतेक मुलं प्रजननाच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यास सक्षम असतात. त्यांना शुक्राणू आणि अंडी याबद्दल कळायला लागतं आणि त्यांना हे देखील माहित असतं की बाळ गर्भाशयात वाढतं. मुलांची आकलनशक्ती आणि इन्ट्रेस्ट याचा विचार करुन या गोष्टी सांगाव्यात. मुलांचा   जन्म कसा होतो हे सांगू शकता. पण, कुटुंब तयार करण्याचा हा एकमेव मार्ग नाही हेही त्यांना सांगावं. लहान मुलं लैंगिक संबंधांऐवजी गर्भधारणा आणि नवजात मुलांमध्ये रस घेतात. मुलांचं शरीर हे त्यांचं स्वतःचं आहे. हे मुलांना समजलं पाहिजे आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांच्या शरीराला स्पर्श करू शकत नाही. हेही त्यांना कळायला हवं. बॅड टच आणि गुड टच बद्दल त्यांना कल्पना द्यावी.

(पायांची जळजळ असह्य होतेय? औषधाबरोबरच करा हे घरगुती उपाय)

शाळेत जाणारी मुलं : 5 ते 8 वयोगट

मुलांना विषमलिंगी,समलिंगी किंवा उभयलिंगी याविषयी मूलभूत समज असायला हवी. लिंग अभिव्यक्तीला मर्यादा आहे,एखाद्या व्यक्तीच्या गुप्तांगांद्वारे हे निश्चित केलं जात नाही हे त्यांना माहित असलं पाहिजे. लैंगिकतेची भूमिका काय आहे? हे देखील त्यांना माहित असलं पाहिजे. खाजगी भाग,नग्नता आणि नातेसंबंधांमधील इतरांचा सन्मान या मूलभूत सामाजिक गोष्टी मुलांना माहित असल्या पाहिजे. या वयात बहुतेक मुलं आपल्या शरीराबद्दल सर्व माहिती मिळवतात.

(एका प्राण्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते जगातील सर्वात महागडी आणि चवदार कॉफी!)

किशोर पूर्व अवस्था : 9 ते 12 वर्षे

पूर्व-पौगंडावस्थेतील मुलांना सुरक्षित लैंगिक संबंध आणि गर्भनिरोधकाबद्दल शिकवलं पाहिजे. गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमणाविषयी (एसटीआय) माहिती दिली पाहिजे. किशोरवयीन असल्याचा अर्थ ते लैंगिक संबंधात सक्रिय झाले आहेत असा होत नाही. हे त्यांना समजायला हवं. पूर्व-पौगंडावस्थेत मुलांना सकारात्मक संबंध आणि वाईट संबंधाबद्दल जागृकता असावी. शिवाय या मुलांमध्ये बुलिंग आणि लैंगिक संबंधांसह इंटरनेट सुरक्षिततेचं ज्ञान वाढवावं.

( विविध आजारांपासून दूर राहायचं असेल तर Walking महत्त्वाचं, हे आहेत 7 फायदे)

पौगंडावस्था: 13 ते 18 वर्षे

पौगंडावस्थेतील मुलांना पीरियड्स आणि रात्रीच्या उत्सर्जनाबद्दल अधिक तपशीलवार माहिती द्यायला हवी आणि ती माहिती सामान्य निकोप असायला हवी. त्यांना गर्भधारणा,एसटीआय,विविध गर्भनिरोधक पर्याय आणि सुरक्षित लैंगिक संबंधांबद्दल माहित असावी.

First published:

Tags: Education, Sex