मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कच्चं दूध आरोग्यासाठी घातक; दुष्परिणामांमुळे होतील पोटाचे विकार

कच्चं दूध आरोग्यासाठी घातक; दुष्परिणामांमुळे होतील पोटाचे विकार

कच्च्या दुधामध्ये (Raw Milk)  अनेक बॅक्टेरिया (Bacteria) देखील असतात. ज्यामुळे टीबी किंवा काही प्राणघातक आजार होऊ शकतात.

कच्च्या दुधामध्ये (Raw Milk) अनेक बॅक्टेरिया (Bacteria) देखील असतात. ज्यामुळे टीबी किंवा काही प्राणघातक आजार होऊ शकतात.

कच्च्या दुधामध्ये (Raw Milk) अनेक बॅक्टेरिया (Bacteria) देखील असतात. ज्यामुळे टीबी किंवा काही प्राणघातक आजार होऊ शकतात.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 25 जुलै : आरोग्यासाठी दूध (Milk) हा सर्वोत्तम आहार आहे. दररोज 1 ग्लास दुधाने आपल्या शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम (Protein & calcium) मिळतं. याशिवाय हाडांना मजबूत (Strong Bones) करण्यासाठी आणि वाढीसाठी मदत करतं. दुधामध्ये पुष्कळ पोषक (Nutrition) घटक आणि एंजाइम असतात. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढण्यात मदत होते. सहसा लोक उकळलेले दूधच पितात. पण, बऱ्याच लोकांना गरम न केलेलं दूध (Raw Milk) प्यायलाही आवडतं.

कच्चं दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Health Benefits) आहे अशी धारणा आहे. पण, नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार कच्च्या दुधाने आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात हे सिद्ध झालं आहे. FDA नुसार प्राण्यांच्या दुधात साल्मोनेला,ई.कोलाई,लिस्टरियासारखे हानिकारक बॅक्टेरिया असतात.

(Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे)

दूध उकळलं नाही तर ते पोटात गेल्यावर विषबाधा होऊ शकते. पाहूया रॉ मिल्क पिण्याने काय नुकसान होतं.

कच्च्या दुधात असे बरेच बॅक्टेरिया असतात जे आपल्या शरीरात पोहोचून रिअ‍ॅक्टिव आर्थराइटिस पासून डायरिया, डिहायड्रेशन, गुलियन-बॅरे सिंड्रोम आणि हीमोलिटिक यूरिमिक सिंड्रोम सारखे गंभीर आजार निर्माण करू शकतात.

दूध काढताना ते दुषित घटकांच्या संर्कात आलेलं असू शकतं.

(प्रेग्नेन्सीत चक्कर येण्याच्या त्रासाने हैराण; पहा कारणं आणि उपाय)

इम्युनिटी कमजोर असणारे लोक, लहान मुलांना कच्चं दूध घेण्याने त्रास होऊ शकतो.

त्यामुळे उलटी येणं, मळमळणं किंवा डायरिया होण्याची शक्यता खूप जास्त असते.

कच्च्या दुधामध्ये अनेक बॅक्टेरिया देखील असतात. ज्यामुळे टीबी किंवा काही प्राणघातक आजार होऊ शकतात.

कच्चं दूध घेतल्यास अ‍ॅसिडीटी वाढते. त्यामुळे डोकंही दुखू शकतं.

(भारतात नाही प्रोटीनबद्दल जागृती; किती घ्यावं? हेच माहित नसतं)

कच्च्या दुधात मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. ज्यामुळे बाहेरील घटकांशी संपर्कत येताच त्यात बॅक्टियरी वाढायला लगतो. त्यामुळे दूध खराब होतं.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Milk combinations