व्हिटॅमीन सीचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे आवळा(Alma). आवळा (Indian Gooseberry) हे एक सुपर फूड (Super food)आहे असं आपण म्हणू शकतो. आवळा शरीरातल्या अनेक समस्या दूर करतो. या सोबतच केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्वचा निरोगी राहण्यासाठी उपयोगी आहे.
सकाळी रिकाम्या पोटाने केवळ 10 मिलीग्रॅम आवळा सर एकदा किंवा दोनदा घ्यावा. आवळ्याचा रस जास्त घेतल्याने आरोग्याला हानिकारक ठरू शकतो. कोमट पाण्यात 2 ते 3 चमचे आवळ्याचा सर घ्यावा. म्हणजे रिकाम्या पोटी घेतला तरी साईड इफेक्ट होणार नाहीत.
आवळ्याची पेस्ट करून त्यात 2 चमचे मध मिसळा. सकाळी आणि संध्याकाळी घ्या. यामुळे सर्दी होणार नाही. जर ती असेल तर ते ठीक होईल.
6 ते 7 दिवस रिकाम्या पोटी फक्त 1 चमचा आवळा रस प्या. त्यामुळे पोटातील जंतूंचा नाश होईल आणि पोट साफ होईल.
पांढरा केस काळे करण्यासाठी आवळा प्रभावी आहे. नारळ तेलात 2 ते 3 आवळे किसून रात्रभर भिजवा. सकाळी या तेलाची मॉलिश करा. केस काळे होतील आणि मजबूतही बनतील.