• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • प्रेग्नेन्सीत चक्कर येण्याच्या त्रासाने हैराण; पहा कारणं आणि उपाय

प्रेग्नेन्सीत चक्कर येण्याच्या त्रासाने हैराण; पहा कारणं आणि उपाय

गर्भधारणेच्या काळात (Pregnancy) असे काही त्रास होतात ज्यावर आपलं नियंत्रण नसतं. वारंवार चक्कर येणं हा त्रास देखील अनेक महिलांना होतो.

 • Share this:
  नवी दिल्ली 24 जुलै : आई होण्याचा अनुभव आयुष्यातला कधीही न विसरणारा अनुभव असतो. 9 महिन्यांच्या गर्भधारणेत (Pregnancy) महिला आपल्या बाळासाठी स्वप्न सजवत असते. काही दिवसानंतर बाळाचा हात हातात येणार या विचाराने ती सुखावलेली असते. कित्येक महिने पाहिलेली वाट आणि डिलीव्हरी (Delivery) चा थकवा बाळाला पाहताच निघुन जातो. गर्भवती (Pregnant) झाल्यानंतर शरीरात अनेक बदल (Many changes in the body) होतात. या बदलांमुळे आपण आई होणार आहोत याची जाणीव होऊ शकते. एस्ट्रोन आणि प्रोजेस्टेरॉनमध्ये वाढ झाल्याने खुप उलट्या होतात. बर्‍याच महिलांना सकाळी उलट्या होतात आणि घाबरल्या सारखे वाटतं. त्याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात.  शरीरात होत असलेल्या बदलांचा केवळ शारीरिक परिणाम होत नाही तर त्याचा मानसिक परिणामही होतो. यापैकी आणखीएक त्रास म्हणजे चक्कर येणं.गर्भधारणेच्या काळात होणारी ही एक साधी समस्या आहे मात्र, ती खुप त्रासदायकही ठरू शकते. काळजी घेतली गेली तर मोठा अपघात होऊ शकतो आणि गर्भाचंही नुकसान होऊ शकतं. या कारणांनी येते चक्करगर्भाची वाढ वेगाने होण्यासाठी गर्भवतीच्या शरीरात रक्त प्रवाह वाढवण्यासाठी हार्मोनल पातळीत वेगवान बदल होतो. ज्यामुळे बर्‍याच वेळा महिलांना लो ब्लडप्रेशर जाणवतं. याशिवाय हायपरमेसीस ग्रॅव्हिडेरिम आणि एक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे गर्भवती महिलांना चक्कर येते. (लाईफस्टाईलमुळे लिव्हरवर वाढतो दबाव, ‘हे’ 5 पदार्थ रोज खा; वाढेल ताकद) सुरवातीच्या 3 महिन्यात चक्कर येते पहिल्या तीन महिन्यांनंतर, बाळ आकाराने वाढू लागतं आणि गर्भाशयाच्या आणि आजूबाजूच्या नसावर दबाव वाढू लागतो. यामुळे, बर्‍याच वेळा चक्कर येण्याची तक्रार महिला करतात. याशिवाय काहिवेळा गर्भलिंग जेस्टेश्नल डायबिटीज, एनीमिया आणि शरीरात पाण्याचा अभाव यामुळेही चक्कर येण्याचा त्रास होतो. असे करा उपाय चक्कर येत असताना आधी खिडक्या आणि दरवाजे उघडा म्हणजे ताजी हवा येत राहील. हळूहळू खाली बसून डोकं गुडघ्यांमध्ये ठेवा. (इच्छा असूनही चवीमुळे पित नाही ग्रीन टी; या पद्धतीने होईल टेस्टी) अचानक उठू नका. शक्य असल्यास डाव्या कुशीवर झोपा. यामुळे मेंदूत रक्त प्रवाह सुधारेल आणि बरं वाटेल. एनर्जी वाढवण्यासाठी लाईट स्नॅक किंवा फळं खा. या गोष्टी लक्षात ठेवा जास्तेवळ उभे राहू नका किंवा बसू नका. थोड्या वेळाने एका जागेवरून उठून चाला, म्हणजे शरीरात रक्तभिसरण व्यवस्थित होईल आणि चक्कर येणार नाही. एकदम उठू नका यामुळे डोकं गरगरतं. थोड्याथोड्या वेळाने केळी किंवा हलकं स्नॅक्स खा. (YouTube वर पाहून त्वचेवर करू नका भलते प्रयोग; साइड इफेक्टमुळे व्हाल हैराण) यामुळे रक्तातील साखरेची पातळी योग्य राहील. गरम पाण्याने आंघोळ करू नका. यामुळे त्रास होईल. कायम सैल कपडे घाला, म्हणजे शरीरात रक्ताचा प्रवाह व्यवस्थित राहिल. भरपूर पाणी प्या, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी घेऊ शकता.
  Published by:News18 Desk
  First published: