नवी दिल्ली, 26 जुलै : आरोग्यासाठी व्हिटॅमीन सीचं (Vitamin C) महत्व सगळ्यांनाच माहिती आहे. व्हिटॅमीन सीमुळे आपली इम्युनिटी (Immunity) वाढते. तर, त्वचा तजेलदार आणि हेल्दी (Glowing & Healthy) बनते. विटामिन सी आहारामध्ये असेल तर, कोलोजन (Collagen) प्रोडक्शन वाढतं आणि त्यामुळे स्किन चांगली व्हायला लागते. यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो आणि वयानुसार होणारा परिणाम (Aging Effect) देखील कमी होतो. व्हिटॅमीन सी मिळवण्यासाठी आपण विविध प्रकारची फळ खाऊ शकतो. फळं व्हिटॅमीन सीचा नैसर्गिक स्त्रोत आहेत. त्यामुळे कोणत्याही गोळ्या खाण्याची गरज पडणार नाही. फळं खाण्याचा कंटाला येत असेल तर, विविध प्रकारचे ज्यूसही (Fruit Juices) वापरू शकता. व्हिटॅमीन सी साठी 5 प्रकारचे ज्युस घेऊ शकता. अननसाचा रस दररोज 1 ग्लास अननसाचा रस घेतल्यास चेहऱ्यावरचे पिंपल्स निघून जातात याशिवाय सुर्याच्या युवी किरणांमुळे त्वचेचं नुकसान झालं असेल तर, त्वचा पुन्हा एकदा चांगली होते. अननसामध्ये अॅन्टीएम्फ्लामेन्ट्री आणि अॅन्टीबॅक्टेरियल गुण असतात. ( कोणत्या वयात आणि कसा होतो संधीवात? पुरूषांपेक्षा महिलांना असतो जास्त त्रास ) त्यामुळे पिंपल्स, रॅशेस होत नाहीत. याशिवाय यातल्या व्हिटॅमीन ए मुळे स्किन उजळते. यामधील अॅन्टीऑक्सीडन्टमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि अननसामध्ये कॅल्शियम,पोटॅशियम,फायबर,फॉस्फरस मॅग्नीज आणि फॉलेट सारखे पोषक घटक असतात. ( जुने कपडे दान करून मिळवा मोठा फायदा; पाहा काय आहे ‘रेमंड’ची नवी एक्सचेंज ऑफर ) आंबा आणि किवी स्मूदी आंबा आणि किवी या दोन्हींमध्ये अॅन्टीऑक्सीडन्ट आणि अॅन्टीएम्फ्लामेन्ट्री गुण आहेत. यामुळे त्वचेचं नुकसान होण्यापासून बचाव होतो. यात व्हिटॅमीन के, फोलेट आणि व्हिटॅमीन सी देखील असतं. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतात. ( काय? आता Fart मुळेही कोविडचा धोका! ढुसकी सोडली तरी पसरू शकतो कोरोना? ) संत्र गाजर यांचा ज्युस संत्र आणि गाजरामध्ये व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे कोलोजनचं उत्पादन वाढतं आणि स्किन हेल्दी होते. यामध्ये अॅन्टीऑक्सीडन्ट असतात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही आणि त्वचा तजेलदार होते. पुदिना आणि लिंबाचा रस या दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचा हेल्दी आणि चमकदार होते. ( चहाच्या कपातली साखरही नाही शाकाहारी; उपवासासाठी वापरण्याआधी हे वाचा ) पीच ज्युस यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे डार्क सर्कल कमी होतात. त्यामध्ये अॅन्टीएम्फ्लामेन्ट्री आणि अॅन्टीऑक्सीडन्ट गुण असतात, त्यामुळे एखादी डाग, रिंकल्स, पिंपल्स कमी होतात. सनबर्नपासून देखील आपलं संरक्षण होतं आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.