• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • जुने कपडे दान करून मिळवा मोठा फायदा; पाहा काय आहे ‘रRaymond’ची नवी एक्सचेंज ऑफर

जुने कपडे दान करून मिळवा मोठा फायदा; पाहा काय आहे ‘रRaymond’ची नवी एक्सचेंज ऑफर

आम्ही आज तुम्हाला अशी स्कीम सांगणार आहोत; ज्यातून तुम्हाला हे कपडे डोनेट तर करता येणार आहेतच, मात्र त्याचसोबत नवे कपडे घेण्यासाठी यातून पैसेही मिळणार आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली 26 जुलै: बऱ्याच वेळा आपण जुने कपडे खराब झालेले नसतानाही वापरणं बंद करतो. एकतर ते आपल्याला बसत नसतात, किंवा मग पुन्हा-पुन्हा वापरुन ते नकोसे झालेले असतात. असे कपडे आपल्याला उपयोगी नसतात. मग एकतर आपण ते टाकून देतो, किंवा घरातील अडगळीच्या खोलीत ते पडून राहतात. कित्येक जण हे कपडे डोनेटही करतात. मात्र, आम्ही आज तुम्हाला अशी स्कीम सांगणार आहोत; ज्यातून तुम्हाला हे कपडे डोनेट तर करता येणार आहेतच, मात्र त्याचसोबत नवे कपडे घेण्यासाठी यातून पैसेही मिळणार आहेत. देशातील आघाडीची गार्मेंट मेकिंग कंपनी रेमंडने (Raymond) एक नवी स्कीम लाँच केली आहे. या स्कीममध्ये तुम्ही जुने कपडे देऊन, नव्या कपड्यांवर डिस्काऊंट (Raymond exchange scheme) मिळवू शकता. जुन्या कपड्यांच्या बदल्यात तुम्हाला फ्री टेलरिंग, किंवा 500 रुपये किंमतीपर्यंतचे व्हाऊचर किंवा मेड-टू-मेजर कुपन मिळू शकणार आहेत. या स्कीमला रेमंडने ‘लूक गूड, डू गूड’ (Look Good, Do Good) असं स्लोगन दिलं आहे. गूंज या एनजीओसोबत (Goonj NGO) रेमंडने ही स्कीम (Raymond scheme) लाँच केली आहे. ‘झी बिझनेस’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Second Hand Phone घेताना फसू नका, या पद्धतीने ओळखा फोन चोरीचा तर नाही? ग्राहक या स्कीमअंतर्गत रेमंडच्या शोरुममध्ये जाऊन, वा वेबसाईटवरुन (Raymond website) आपले जुने कपडे दान करू शकणार आहेत. यासाठी चार टप्पे आहेत. कपडे दान करण्यासाठी सर्वात आधी, मायरेमंड डॉट कॉम (MYRAYMOND.COM) या वेबसाईटवर जाऊन आपल्या जुन्या कपड्यांची माहिती द्यावी लागणार आहे. पुढे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला फ्री टेलरिंग किंवा 500 रुपयांचे ॲपरल व्हाऊचर मिळेल. यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही रेमंडच्या वेबसाईटवरच आपल्या व्हाऊचरचा उपयोग करू शकाल. चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला आपले जुने कपडे रेमंडच्या कर्मचाऱ्याला द्यावे लागतील. रेमंडने या स्कीमसाठी गूंज या स्वयंसेवी संस्थेशी (NGO Goonj) टायअप केलं आहे. ही संस्था देशातील 23 राज्यांमध्ये लोकांच्या विकासासाठी काम करते. आपत्तीग्रस्त भागांमध्ये गरजू लोकांना कपडे पुरवण्याचे काम ही संस्था करते. माणसाच्या तीन मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे वस्र. हीच गरज पूर्ण करण्यासाठी ही संस्था काम करत आहे. सध्या देशात बऱ्याच ठिकाणी पूर आणि भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती येत आहेत. यातच रेमंडने घेतलेल्या या पुढाकारामुळे बऱ्याच गरजू लोकांपर्यंत कपडे पोहोचणार आहेत. यामध्येच तुम्हालाही खारीचा वाटा उचलता येणार आहे.
First published: